मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Ola देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, केवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा E-scooter plant

Ola देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, केवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा E-scooter plant

तमिळनाडूतील ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्लांट (Ola Electric Scooter Plant) केवळ महिला चालवतील. महिलांद्वारे चालवला जाणारा जगातील Ola हा पहिलाच मोटर व्हिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ठरेल.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : Ola ने देशातील ऑटो मार्केटमध्ये ई-स्कूटर (Ola E-scooter) लाँच केल्यानंतर आता आणखी एक पाउल टाकलं आहे. कंपनीचे सहसंस्थापक भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी, तमिळनाडूतील ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्लांट (Ola Electric Scooter Plant) केवळ महिला चालवतील अशी माहिती दिली आहे. त्यासाठी प्लांटमध्ये 10 हजारहून अधिक महिलांची नियुक्ती केली जाईल. आत्मनिर्भर भारताला (Aatmanirbhar Bharat) आत्मनिर्भर महिलांची गरज आहे असं म्हणत त्यांनी केवळ महिलांद्वारे चालवला जाणारा जगातील Ola हा पहिलाच मोटर व्हिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असल्याचं म्हटलं आहे. भाविश अग्रवाल यांनी ओला ई-स्कूटर प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या बॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांनी सांगितलं, फ्यूचर फॅक्टरी (Ola FutureFactory) 10 हजारहून अधिक महिला कर्मचाऱ्यांसह जगातील सर्वात मोठी केवळ महिलांद्वारा चालवण्यात येणारी फॅक्टरी बनेल. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि अधिक समावेशक कार्यबल तयार करण्यासाठी Ola चा प्रयत्न आहे. तसंच या महिलांचे कोर मॅन्युफॅक्चरिंग स्किल्स अधिक उत्तम करण्यासाठी मोठी गुंतवणूक केल्याचंही त्यांनी सांगितलं. या महिला ओला फ्यूचर फॅक्टरीमध्ये बनणाऱ्या प्रत्येक वाहनासाठी पूर्णपणे जबाबदार असल्याचंही Ola कडून सांगण्यात आलं आहे.

OLA e-scooter: या 4 चार राज्यात सबसिडी अंतर्गत स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

Ola चे अध्यक्ष अग्रवाल यांनी एका रिपोर्टचा हवाला देत सांगितलं, की केवळ महिलांच श्रमशक्तीमध्ये (Labour Workforce) समान संधी मिळाल्याने देशाचा GDP 27 टक्क्यांनी वाढू शकतो. अशा उत्पादन क्षेत्रात महिलांचा सहभाग सर्वात कमी 12 टक्के आहे. महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करुन देणं आणि त्यांना सक्षम करण्याने केवळ त्यांच्याच जीवनात नाही तर, त्यांच्या कुटुंबात आणि समाजातही सुधारणा होईल.

Ola E-Scooter खरेदी करायचा विचार करताय? पाहा किती भरावा लागेल EMI

दरम्यान, E-scooter निर्माता Ola ने मागील वर्षी तमिळनाडूमध्ये आपल्या पहिल्या E-scooter प्लांटमध्ये 2400 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली होती. दरवर्षाला 10 लाख क्षमतेसह उत्पादन सुरू होईल. त्यानंतर बाजारातील मागणीनुसार, 20 लाखांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं, असं Ola कडून सांगण्यात आलं आहे.
First published:

Tags: Electric vehicles

पुढील बातम्या