स्टॉक संपवण्यासाठी HYUNDAI गाड्यांवर जबरदस्त ऑफर, होऊ शकतो 2.50 लाखांपर्यंतचा फायदा

मुंबई, 16 फेब्रुवारी : ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) कडून फेब्रुवारी महिन्यात जबरदस्त ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये CRETA, GRAND i10 NIOS, ELITE i20, SANTRO या गाड्यांवर 2.50 लाखांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. ह्युंदाईची ही ऑफर गाड्यांच्या BS-IV मॉडेल्ससाठी मर्यादित आहे. या ऑफर्सचा फायदा तुम्ही 29 फेब्रुवारीपर्यंत घेऊ शकता.

  • Share this:

VERNA: या गाडीची एक्स शोरूम दिल्लीतील किंमत 8.17 लाखांपासून 14 लाख रुपयांपर्यंत आहे. यातील पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही प्रकारच्या मॉडेल्सवर 90 हजारांचे फायदे आहेत.

CRETA: ह्युंदाई क्रेटाच्या पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हॅरिएंट्सवर 1 लाख 15 हजारांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. या गाडीची एक्स शोरूम दिल्लीतील किंमत 10 लाख रुपयांपासून 15.72 लाख इतकी आहे.

GRAND i10 NIOS: या मॉडेलच्या डिझेल व्हॅरिएंटवर 55 हजार रुपयापर्यंतचे फायदे मिळणार आहेत. GRAND i10 NIOS ची एक्स शोरूम दिल्लीतील किंमत 5 लाख रुपयांपासून 8 लाखांपर्यंत आहे.

ELANTRA: या मॉडेलची एक्स शोरूम दिल्लीतील किंमत 15.89 लाखांपासून 20.39 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही व्हॅरिएंट्सवर 2.50 लाखांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत.

ELITE I20: या गाडीतील Sportz आणि त्यानंतरच्या मॉडेल्सवर 65 हजार रुपयांचे तर Era आणि Magna या मॉडेल्सवर 45 हजारांचे फायदे मिळणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्हीं प्रकारासाठी हे फायदे उपलब्ध आहेत. दिल्ली एक्स शोरूममधील या गाड्यांची किंमत 5.59 लाख रुपये ते 9.41 लाखांपर्यंत आहे.

GRAND i10: यातील पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅरिँटवर 75 हजारापर्यंतचे फायदे आहेत. एक्स शोरूम दिल्लीतील या गाडीची किंमत 6 लाख रुपयांपासून 6.57 लाख रुपये इतकी आहे.

SANTRO: या गाडीच्या पेट्रोल व्हॅरिअंटवर 55 हजारांपर्यंतचे फायदे आहेत. एक्स शोरूम दिल्लीमध्ये याची किंमत 4.57 लाख ते 5.98 लाखांपर्यंत आहे.

TUCSON: या मॉडेलची एक्स शोरूम दिल्लीतील किंमत 18.76 लाखांपासून 27 लाखांपर्यंत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्ही व्हॅरिएंट्सवर 2.50 लाखांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत.

XCENT: ह्युंदाई एक्सेंटची दिल्ली एक्स शोरूममधील किंमत 5.81 लाखांपासून 8.79 लाखांपर्यंत आहे. या मॉडेलवर सध्या 95 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दोन्हीं प्रकारासाठी हे फायदे उपलब्ध आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या