सावधान! UPI युजर्ससाठी NPCI कडून Alert जारी, या वेळेत पेमेंट करू नका अन्यथा...

सावधान! UPI युजर्ससाठी NPCI कडून Alert जारी, या वेळेत पेमेंट करू नका अन्यथा...

जर तुम्हीही UPI पेमेंट करत असल्यास पुढील काही दिवस रात्रीच्या वेळी समस्या येऊ शकतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक अलर्ट जारी केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी : कोरोना काळात UPI आणि डिजिटल पेमेंट व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. जर तुम्हीही UPI पेमेंट करत असल्यास पुढील काही दिवस रात्रीच्या वेळी समस्या येऊ शकतात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) एक अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये आज मध्यरात्रीनंतर यूपीआय पेमेंटमध्ये समस्या येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. NPCI ने ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. NPCI ने युजर्सला रात्री 1 ते 3 पर्यंत UPI पेमेंट न करण्याचं सांगितलं आहे.

NPCI ने याबाबत माहिती देताना सांगितलं की, पेमेंट एक्सपिरियंस चांगला करण्यासाठी सिस्टम रात्री 1 ते 3 दरम्यान अपग्रेड केलं जात आहे. त्यामुळे या वेळेत पेमेंट करण्यासाठी समस्या येऊ शकतात. पैसे ट्रान्सफर करताना समस्यांपासून वाचण्यासाठी युजर्सनी दिवसभरात महत्त्वाचे व्यवहार करावते असंही NPCI कडून सांगण्यात आलं आहे.

मागील काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन ट्रान्झेक्शन करणाऱ्या लोकांना निशाणा केलं जात आहे. त्यामुळे युजर्सनी आपल्या बँक अकाउंटबाबत सावध राहावं. वाढते फसवणूकीचे प्रकार पाहता बँका, आरबीआय, एनपीसीआय आणि सरकारकडूनही याबाबत वेळोवेळी सतर्क करण्यात येत आहे. त्यामुळे UPI पेमेंट करतानाही अतिशय सावध असणं महत्त्वाचं ठरतं.

फ्रॉडपासून वाचण्यासाठी -

कोणत्याही व्यक्तीकडून, कोणतीही सरकारी एजेन्सी, बँका आणि इतर वित्तिय संस्था मेसेजद्वारे (SMS) माहिती मागत नाहीत. परंतु जर अशाप्रकारे मेसेजद्वारे अकाउंटसंबंधी किंवा अधिक खासगी माहिती मागितली जात असल्यास, तुमच्या बँक किंवा ई-वॉलेट फर्मला याबाबत सूचना द्या. तसंच, पोलीस किंवा सायबर सेलमध्येही याबाबत तक्रार दाखल करू शकता. त्याशिवाय ग्राहकांनी कोणतंही App पडताळणीशिवाय डाउनलोड करू नये, फोनवर आलेल्या मेसेजला उत्तर देऊ नये. तसंच कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नये.

Published by: Karishma Bhurke
First published: January 23, 2021, 8:59 AM IST
Tags: upi

ताज्या बातम्या