पेटीएमवरही करू शकता मेसेज, पेमेंटसोबत आता मेसेजिंग अॅप

पेटीएमवरही करू शकता मेसेज, पेमेंटसोबत आता मेसेजिंग अॅप

आता तुम्ही व्हाॅटस्अपचा अनुभव पेटीएमवर घेऊ शकता. पेटीएमनं मेसेजिंगचं नवं फीचर लाँच केलंय. यात युजर्स मेसेजिंग अॅपद्वारे चॅट करू शकतात.

  • Share this:

03 नोव्हेंबर : आता तुम्ही व्हाॅटस्अपचा अनुभव पेटीएमवर घेऊ शकता. पेटीएमनं मेसेजिंगचं नवं फीचर लाँच केलंय. यात युजर्स मेसेजिंग अॅपद्वारे चॅट करू शकतात. आपल्या मित्रांना फोटो आणि व्हिडिओज पाठवू शकतात. पेटीएमनं या फीचर्सला 'इनबाॅक्स' असं नाव दिलंय.

या फीचर्समुळे युजर्स एखाद्याला पेमेंट केल्यावर ते पोचलं की नाही याबद्दल चॅट करू शकतात. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ दीपक अबाॅटचं म्हणणं आहे, लवकरच इनबाॅक्स फीचर एंड्राॅइड आणि आयओएसमध्ये उपलब्ध होईल.

पेटीएमच्या या नव्या फीचरमुळे व्हाॅट्सअपला आव्हान आहे. पेटीएमचे 27 लाख युजर्स आहेत. 50 लाख व्यावसायिक पेटीएमवर व्यवहार करतात. व्हाॅटसअप जागतिक मेसेजिंग अॅप आहे. भारतात 30 कोटी स्मार्टफोनमध्ये हे अॅप आहे.

या स्पर्धेत उतरण्यासाठी व्हाॅटस्अपही पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. डिसेंबरपर्यंत ही सेवा सुरू होईल. 2010मध्ये मोबाइल फोनचं बिल पेमेंट करायला पेटीएम सुरू झालं आणि नंतर पेटीएमनं मोठी प्रगती केलीय.

First published: November 3, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading