Home /News /technology /

OMG! आता फिल्ममधील 'मिस्टर इंडिया'सारखे तुम्हीही खरोखर होऊ शकता गायब; कसं ते पाहा VIDEO

OMG! आता फिल्ममधील 'मिस्टर इंडिया'सारखे तुम्हीही खरोखर होऊ शकता गायब; कसं ते पाहा VIDEO

शास्त्रज्ञांनी एक खास शील्ड तयार केली आहे, ज्यामुळे माणसं गायब होऊ शकतात.

    मुंबई, 18 मार्च : बॉलिवूड फिल्म मिस्टर इंडिया (Mister India Film) तर तुम्ही पाहिलीच असेल. ज्यामध्ये फक्त एका घड्याळाचं एक स्विच दाबताच हीरा गायब होतो. त्याचा फक्त आवाज ऐकू येतो पण तो मात्र दिसत नाही. त्यावेळी आपल्याकडेही आपल्याला अशी गायब करणारी एखादी वस्तू असती तर, असं प्रत्येकाला वाटलंच असेल. आता तुम्ही ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली. खरोखर तुम्हीही मिस्टर इंडियासारखे गायब होऊ शकता. मिस्टर इंडियासारखं घड्याळ नाही पण एक अशी शीट बनवण्यात आली आहे जी माणसांना गायब करू शकते. आतापर्यंत फक्त फिक्शन स्टोरी, फिल्म, स्वप्नं यामध्ये असलेली माणसाची गायब होण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. विज्ञानाच्या मदतीने शास्त्रज्ञांनी हे शक्य करून दाखवलं आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक अशी इनव्हिजिबल शील्ड डेव्हलप केली आहे, ज्याच्या मागे जाताच व्यक्ती गायब होते (Scientists develop an Invisible Shield). यामध्ये एक खास लेन्सचा वापर करण्यात आला आहे. ज्यावर लाइन पडतात एक वेगळ्या पद्धतीचा इफेक्ट येतो. यामागे असलेल्या वस्तू गायब होतात. हे वाचा - कसं शक्य आहे? ड्रायव्हरशिवायच चालू लागली रिक्षा; विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO जेव्हा शील्डच्या मागे तीव्र प्रकाश पडतो तेव्हा तो फोकल प्वाइंटवर रिफ्रॅक्ट होतो आणि इतरत्र पसरतो. शील्डच्या समोरील भाग शॅलो अँगलपर्यंत जातो आणि लाइट आतल्या बाजूने रेफ्लेस्ट होऊ लागते. याच डिफ्युजन, रेफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचा खेळ आहे. ज्यामुळे शील्डच्या मागे असलेला माणूस दिसत नाही. शील्डमध्ये वापरण्यात आलेलं मटेरिअल यूव्ही किरणं आणि तापमान झेलू शकतं, ते खूप मजबूत आहेत. एकसारखा बॅकग्राऊंट असेल तर त्यावर ही शील्ड चांगली काम करते. Invisiblity Shield Co. या लंडनमधील कंपनीने ही शील्ड तयार केली आहे.  डेली मेलच्या रिपोर्टनुसार कंपनीने आतापर्यंत अशा 25  इनव्हिजिबल शील्ड्स तयार केल्या आहेत. कंपनीने सांगितलं, की यासाठी त्यांना खूप रिसर्च करावा लागला आणि मेहनत घ्यावी लागली. वेगवेगळ्या मटेरिअल्सचा वापर केला आणि बऱ्याचदा त्यांचा प्रयोग फेलही झाला. अखेर त्यांनी माणसांना गायब करणारी ही शील्ड तयारच केली. हे वाचा - मल प्रत्यारोपणातून 'या' मानसिक आजारावर मात करणं शक्य; संशोधकांचा दावा  या शील्ड दोन आकारात उपलब्ध आहे. 12×8 इंचाची छोटी शिल्ड 5 हजार रुपये तर 37×25 ची मोठी शील्ड 30 हजार रुपयांची आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Technology

    पुढील बातम्या