• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • काय सांगता! आता फोनमध्ये इंटरनेट नसेल तरीही होणार कामं; Google नं लाँच केलं नवं अ‍ॅप

काय सांगता! आता फोनमध्ये इंटरनेट नसेल तरीही होणार कामं; Google नं लाँच केलं नवं अ‍ॅप

या अ‍ॅपची खास बाब म्हणजे या अ‍ॅपद्वारे विना इंटरनेट आणि ब्लूटूथ कनेक्शनशिवाय डिव्हाईस कनेक्ट करता येणार आहे. म्हणजेच फोनमध्ये नेटवर्क नसल्यासही वाय-फायशी संबंधित सर्व कामं या अ‍ॅपच्या मदतीने करता येतील.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 मार्च : टेक कंपनी गुगलने (Google) एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. WifiNanScan असं या गुगलच्या नव्या अ‍ॅपचं नाव आहे. या अ‍ॅपची खास बाब म्हणजे या अ‍ॅपद्वारे विना इंटरनेट आणि ब्लूटूथ कनेक्शनशिवाय डिव्हाईस कनेक्ट करता येणार आहे. म्हणजेच फोनमध्ये नेटवर्क नसल्यासही वाय-फायशी संबंधित सर्व कामं या अ‍ॅपच्या मदतीने करता येतील. तसंच Wifi Aware या अ‍ॅपच्या मदतीने विना इंटरनेट कनेक्शन युजर्स रेस्टॉरंटमध्ये सीट बुकिंग आणि मूव्ही तिकिटही बुक करू शकतील, असा दावा करण्यात आला आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play store) डाउनलोड करता येऊ शकतं. सध्या हे अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी बनवण्यात आलं आहे. ज्याला ते Wifi Aware सह एक्सपेरिमेंट करत आहेत. काय आहे Wifi Aware? वायफाय अवेअर (Wifi Aware) एक Neighbour Awareness Networkig आहे, जे कोणत्याही एक्सटर्नर डिव्हाईसशिवाय एका स्मार्टफोनला दुसऱ्या स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यासाठी मदत करतं. हा प्रोटोकॉल 8.0 आणि त्यावरील ओएस वर्जनच्या सर्व डिव्हाईससह काम करेल. तसंच कोणत्याही प्रकारच्या कनेक्टिव्हिटीशिवाय, एकमेकांना सर्च न करता, थेट कनेक्ट करण्याची सुविधा हे अ‍ॅप देतं, असं सांगण्यात आलं आहे.

  (वाचा - या होळीला खरेदी करा नवी कार; एक दोन नव्हे तब्बल 33 गाड्यांवर बंपर डिस्काउंट)

  9to5Google रिपोर्टनुसार, WifiNanScan अ‍ॅप सिलेक्टेड स्मार्टफोनवरच चालेल, जे अँड्रॉईड 8 आणि त्याहून हायर वर्जनला सपोर्ट करतं. काय आहेत या अ‍ॅपचे फायदे - - अ‍ॅपद्वारे वापरण्यात आलेल्या नेटवर्कच्या मदतीने युजर्स सुरक्षितपणे प्रिंटरवर डॉक्युमेंट पाठवू शकतात. कोणत्याही नेटवर्क लॉगइन शिवाय हे काम होईल. - या अ‍ॅपमुळे शाळेत स्वत:च चेक इन आणि रोल कॉल होऊ शकतो. - एअरपोर्ट सिक्योरिटी, कस्टम, इमिग्रेशनमध्ये कोणत्याही आयडीशिवाय चेकइन करता येईल.

  (वाचा - VIDEO: सलून चालवणाऱ्या या व्यक्तीकडे आहेत 378 लग्जरी कार्स; पाहा त्यांची स्टोरी)

  - Wifi Aware अ‍ॅपच्या मदतीने विना इंटरनेट कनेक्शन युजर्स कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये सीट बुकिंग आणि थिएटरमध्ये मूव्ही तिकिट बुक करू शकतात. - हे अ‍ॅप 1 मीटर ते 15 मीटरपर्यंत काम करतं, असं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published: