मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आपल्या घरातील उत्पादनाचे स्टँडर्ड काय, हे जाणून घेणं झालं सोपं

आपल्या घरातील उत्पादनाचे स्टँडर्ड काय, हे जाणून घेणं झालं सोपं

उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांचे पालन करावे लागते. तसेच त्यांना गुणवत्तेनुसार मानांकन (Standard) देणारी यंत्रणाही असते.

उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांचे पालन करावे लागते. तसेच त्यांना गुणवत्तेनुसार मानांकन (Standard) देणारी यंत्रणाही असते.

उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांचे पालन करावे लागते. तसेच त्यांना गुणवत्तेनुसार मानांकन (Standard) देणारी यंत्रणाही असते.

नवी दिल्ली, 4 जून: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण विविध प्रकारची उत्पादनं (Products) वापरत असतो. घराघरात काही किमान उपकरणे तरी असतातच. कोणतेही उपकरण चांगल्या दर्जाचे असावे यासाठी आपण उत्तम ब्रँडची (best brands) निवड करतो. एखादे उपकरण घेण्यापूर्वी ते कोणत्या कंपनीचे असावे, घेताना कोणत्या गोष्टी बघाव्यात याबाबत आपण इतरांचा सल्ला घेतो. जेणेकरून आपण घेतलेले उपकरण दीर्घकाळ चालेल, त्याचा देखभाल खर्च कमी असेल आणि त्यापासून कसल्याही प्रकारचे नुकसान होत नसेल. यासाठी सरकारनेही काही नियम बनवलेले असतात. प्रत्येक देशातील निकष वेगळे असतात. उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांचे पालन करावे लागते. तसेच त्यांना गुणवत्तेनुसार मानांकन (Standard) देणारी यंत्रणाही असते.

आपल्या देशात यासाठी बीआयएस (BIS-Bureau of Indian Standards) अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही नियामक यंत्रणा कार्यरत आहे. कोणत्याही उत्पादनाचे भारतीय मानक (Standards) ही यंत्रणा निश्चित करते. देशात विकल्या जाणार्‍या सर्व उत्पादनांसाठी एक मानक निश्चित केले गेले आहे. कंपन्यांना या मानकांनुसार उत्पादने तयार करावी लागतात. मगच त्याची विक्री करता येते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस मानकांवर उतरणाऱ्या उत्पादनासाठी कंपन्यांना परवाना देते, उत्पादनात मानकांचे पालन होत नसेल तर बीआयएस अशा कंपन्यांविरूद्ध कारवाई करू शकते. मात्र आतापर्यंत सामान्य लोकांना उत्पादनाचे मानक माहित असण्याची सोय नव्हती.

Yamaha प्रेमींसाठी खुशखबर, या दोन धमाकेदार बाईकच्या किंमतीत मोठी घसरण

आता ग्राहकांना आपण खरेदी केलेल्या उत्पादनाची मानक काय आहेत हे जाणून घेता यावे यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आपल्या साइटवर एक सुविधा उपलब्ध करणार आहे. ही सुविधा 5 जूनपासून कार्यान्वित होईल. पाच जूननंतर कोणतीही व्यक्ती आपल्याकडे असलेल्या कोणत्याही उत्पादनाच्या मानकांबद्दल सहजपणे जाणून घेऊ शकेल. मानकानुसार उत्पादन नसेल तर त्याविरुद्ध तक्रार देता येईल.

उत्पादनाचे मानक जाणून घेण्यासाठी :

कोणत्याही उत्पादनाचे मानक जाणून घेण्याकरता सर्वांत आधी ग्राहकांना https://bis.gov.in/ वर जाऊन साइट उघडावी लागेल. साइट उघडताच ‘नो युवर स्टँडर्ड’ (Know your standard) हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर, त्यात सुमारे 1100 उत्पादने दिसतील. तुम्हाला उत्पादनाचा नंबर माहित असेल तर तो इथं टाकून किंवा उत्पादनाचे नाव टाकून तुम्ही त्याची माहिती शोधू शकता. या उत्पादनाची मानकं काय आहेत? बाजारात (Market) या उत्पादनाच्या कोणत्या सेवा आहेत, परवाना कसा देण्यात आला आहे, कायदेशीर मदत कशी मिळू शकेल अशी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असेल. त्यामुळे आता ग्राहकांना (Consumer) आपण खरेदी केलेलं उत्पादन योग्य मानकानुसार आहे की नाही याची खात्री करून घेता येणार आहे. ग्राहकांच्या दृष्टीनं ही फार मोठी सुविधा आहे.

First published:
top videos

    Tags: Technology