मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता Amazon Prime Video चं हे खास फीचर भारतातही उपलब्ध; पाहा कसं वापरता येणार

आता Amazon Prime Video चं हे खास फीचर भारतातही उपलब्ध; पाहा कसं वापरता येणार

स्ट्रिमिंग सेशन दरम्यान सदस्याकडे प्राईम मेंबरशिप किंवा प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. वॉच पार्टीचा होस्ट या सेशनमधील व्हिडिओ प्ले, पॉज आणि स्कीप करून कंट्रोल करू शकतो. चॅट बॉक्ससुद्धा दिला आहे, जेणेकरून मूव्ही बघत असताना चॅट देखील करता येणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 8 डिसेंबर : अ‍ॅमेझॉनने भारतात नवीन वॉच पार्टी फिचर आणलं आहे, यामुळे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ बघताना ग्रुपने त्याचा आनंद घेता येणार आहे. स्ट्रीमिंग फिचरमुळे युजर होस्ट आणि इतर जणही वॉच पार्टीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सिंक्रोनाइज्ड प्लेबॅक ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे सगळ्यांना व्हिडीओचा आवाज व्यवस्थित येऊ शकेल. प्राईम व्हिडिओ क्लायंटवर हे वापरता येणार आहे. 100 जण एका वॉच पार्टी सेशनचा (Watch Party session) भाग घेऊ शकतात. या फिचरची सुरुवात अ‍ॅमेझॉन प्राईमने पहिल्यांदा जुलैमध्ये US मध्ये केली आणि हळूहळू ते UK आणि इतर देशात सुरू झालं. अ‍ॅमेझॉनने विकसित केलेलं वॉच पार्टी फिचर आजपासून भारतात उपलब्ध आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, स्ट्रिमिंग सेशन दरम्यान सदस्याकडे प्राईम मेंबरशिप किंवा प्राईम व्हिडीओ सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. वॉच पार्टीचा होस्ट या सेशनमधील व्हिडिओ प्ले, पॉज आणि स्कीप करून कंट्रोल करू शकतो. चॅट बॉक्ससुद्धा दिला आहे, जेणेकरून मूव्ही बघत असताना चॅट देखील करता येणार आहे. हे फिचर फक्त अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वेबच्या क्लायंटवर (Amazon Prime Video Web Client) चालतं, युजरने जर ॲपवर हे फीचर चालू करण्याचा प्रयत्न केला, तर ॲप तुम्हाला फोनच्या ब्राउझरवर घेऊन जाईल.

(वाचा - चीनी स्मार्टफोन कंपनीचं धक्कादायक कृत्य; 20 कोटी मोबाईलमध्ये टाकला Virus)

वॉच पार्टी सुरू करण्यासाठी वेब ब्राउझरवर व्हिडीओ चालू करा, टीव्ही शो किंवा कार्यक्रम काय पाहू इच्छिता तो निवडा आणि त्याच्या बटनाच्या शेजारील वॉच पार्टी बटन क्लिक करा, तुमचं नाव लिहून ती लिंक कॉपी करून तुमच्या इतर मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवा. अशाप्रकारे कोरोना काळात एकत्र मुव्ही बघण्याचा अनुभव घेऊ शकता. अ‍ॅमेझॉनला अशी आशा आहे की, प्राईमवरील वॉच पार्टीमुळे या कारोनाच्या काळात (social distance) सामाजिक अंतर राखण्यास मदत होईल. सध्या भारतात, अ‍ॅमेझॉन प्राईमच्या सबस्क्रिप्शनची किंमत दरमहा 129 रुपये, तर वर्षाला 999 रुपये आहे. हे सबस्क्रिप्शन वापरून तुम्ही अमेझॉन म्युझिकवर एचडी क्वालिटी म्युझिक, Amazon.com प्राईमचं सदस्यत्व असं फायदे मिळवू शकता.

(वाचा - WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक)

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या या वॉच पार्टी फीचरला टेलेपार्टी फिचरसारखं कोणतंही जादाचं प्लग इन गरजेचं नाही, नेटफलिक्सवरील मुव्हीज आणि शोसारखे हे फिचर तुम्ही प्लगइन शिवाय वापरू शकता. यूजर एकापेक्षा अधिक पार्टी करू शकतात. त्यासाठी फक्त गुगल क्रोम ब्राउझरची आवश्यकता आहे.
First published:

Tags: Amazon

पुढील बातम्या