मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Made in China ला जोरदार धक्का! TATA करणार मोबाइल पार्ट्सचं उत्पादन

Made in China ला जोरदार धक्का! TATA करणार मोबाइल पार्ट्सचं उत्पादन

टाटा सन्स कंपनी (Tata sons group) भारतात (India) मोबाइलचे पार्ट्स (Mobile manufacturing) बनवण्याचा मोठा प्रकल्प तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) उभारण्याच्या तयारीत आहे.

टाटा सन्स कंपनी (Tata sons group) भारतात (India) मोबाइलचे पार्ट्स (Mobile manufacturing) बनवण्याचा मोठा प्रकल्प तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) उभारण्याच्या तयारीत आहे.

टाटा सन्स कंपनी (Tata sons group) भारतात (India) मोबाइलचे पार्ट्स (Mobile manufacturing) बनवण्याचा मोठा प्रकल्प तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) उभारण्याच्या तयारीत आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 07 डिसेंबर : माहिती आणि तंत्रज्ञान (IT) उद्योगात आपला वेगळा ठसा उमटवणारा आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) देश एका बाबतीत मात्र बऱ्याच अंशी चीनवर अवलंबून आहे. भारतच नाही तर जगातल्या सर्व मोठ्या देशांना मोबाईल निर्मितीसाठी लागणारे सुट्टे भाग आणि असेंबलिंगसाठी चीनवर अवलंबून राहावं लागतं. पण आता मोबाईल (Mobile manufacturing ) क्षेत्रात भारतातला मोठा ब्रँड उतरणार आहे. भारतात अजूनही मोबाईलचे सुट्टे भाग इतर देशातून मागवावी लागतात. बऱ्याचदा आपल्या फोनवर मेड इन इंडिया (Made In india) लिहिलेलं स्टीकर पाहतो. पण तो फोन पूर्णपणे भारतीय निर्मितीचा नसतो. सध्या जागतिक बाजारात मोबाईलचे पार्ट्स पुरवण्यात जपान (Japan), कोरिया (Koria) , चीन (China) या देशांची मक्तेदारी आहे. सध्या भारतात मोबाईल उत्पादन करणाऱ्या काही कंपन्या आहेत. पण त्यांची व्याप्ती चीन सारख्या बलाढ्य देशाच्या तुलनेत खुपच नगण्य आहे. भारताला मोबाइलचे विविध पार्ट्स अजूनही बाहेरील देशातून मागवावे लागतात. पण ही समस्याही आता लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण टाटा समूह (Tata Group) या क्षेत्रात पुढाकार घेण्याच्या तयारीत आहे. ही कंपनी देशातच मोबाईलचे सुट्टे भाग बनवणार आहे. त्यामुळे मोबाईल उत्पादक क्षेत्राला काहीसा दिलासा मिळणार आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सन्स कंपनी भारतात मोबाइलचे पार्ट्स बनवण्याचा मोठा प्रकल्प तामिळनाडूमध्ये उभारण्याच्या तयारीत आहे. या योजनेत टाटा समूह तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, टाटा समूह या योजनेसाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेणार असल्याचंही एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यातील 75 कोटी डॉलर्स ते एक अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम कंपनी एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोईंगद्वारे (ECB) जमवणार आहे. टाटा समूह (Tata Group) सध्या या आगामी मोबाईल उत्पादक कंपनीच्या सीईओच्या शोधात आहे. नव्या प्रकल्पात सर्वप्रथम आयफोनचे पार्ट्स बनवले जातील असं सांगितलं जात आहे. यामुळे भारतीय बाजारात दर्जेदार मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. याचा जबरदस्त फटका आता चीनी कंपन्याना बसणार आहे. कारण भारतील बरीचशी बाजारपेठ चीनी कंपन्यांनी काबीज केली आहे. हा प्रकल्प जर चांगल्याप्रकारे यशस्वी झाला तर चिनी कंपन्यांची देशातील मक्तेदारी संपुष्टात येईल आणि खऱ्या अर्थाने देश आत्मनिर्भर बनेल.
First published:

Tags: China, Mobile

पुढील बातम्या