नवी दिल्ली, 3 डिसेंबर : फिनलँडची स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया (Nokia) लवकरच भारतात आपला लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, 27 नोव्हेंबर रोजी नोकिया लॅपटॉप, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS च्या वेबसाईटवर पाहण्यात आला आहे. त्यामुळे कंपनी लवकरच आपला लॅपटॉप बाजारात आणण्याची शक्यता आहे. अद्याप कंपनीकडून लॅपटॉपसंबंधी कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
बीआयएस लिस्टिंगनुसार, नोकियाचे लॅपटॉप चीनमध्ये टोंगफँग लिमिटेड निर्मित केले गेले आहेत. कंपनी Nokia ब्रँडअंतर्गत 9 लॅपटॉप भारतात लाँच करू शकते.
नोकियाचे सर्व लॅपटॉप Intel Core i3 आणि Core i5 प्रोसेसरसह लाँच केले जाणार आहेत. त्याशिवाय Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. लॅपटॉपबाबत इतर कोणत्याही माहितीचा खुलासा करण्यात आलेला नाही. नोकिया लॅपटॉपच्या किंमतीबाबत आणि स्टोरेज कॅपेसिटीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Nokia च्या इतर प्रोडक्ट्स स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग बॉक्सप्रमाणे हे लॅपटॉपही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्हली सेलसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे.