मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

क्या बात है! आता हवेतूनही प्रवास होणार शक्य; नासानं सुरु केली Air Taxi ची ट्रायल

क्या बात है! आता हवेतूनही प्रवास होणार शक्य; नासानं सुरु केली Air Taxi ची ट्रायल

आता हवेतून प्रवास करण्यासाठी खास टॅक्सी डिझाईन करण्यात आली आहे.

आता हवेतून प्रवास करण्यासाठी खास टॅक्सी डिझाईन करण्यात आली आहे.

आता हवेतून प्रवास करण्यासाठी खास टॅक्सी डिझाईन करण्यात आली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर: जगात टेक्नॉलॉजीच्या (Technology) क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. नवनवीन टेक्नॉलॉजी प्रगत होत आहे. त्यात आता Air Taxi चालू होणार आहे.  हो. आम्ही खरं सांगत आहोत. आता तुम्ही चक्क हवेच्या माध्यमातून प्रवास (Traveling through Air) करू शकणार आहात. ओला (Ola), उबरसारख्या (Uber) मोठ्या टॅक्सी कंपनी टॅक्सिच्या (Air Taxi) व्यावसायात आहेत. मात्र आता हवेतून प्रवास करण्यासाठी खास टॅक्सी डिझाईन करण्यात आली आहे. या Taxi ची ट्रायल NASA नं सुरू केली आहे.

eVTOL नावाची ही टॅक्सी आहे. जॉबी एविएशन हा कंपनीनं ही Air Taxi तयार केली आहे. ही टॅक्सी 2024 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. याचा वापर प्रवास आणि माल एका शहरातून दुसऱ्या शहरात नेण्यासाठी केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. Taxi ची चाचणी ही चाचणी 10 दिवस चालणार आहे. त्याची सुरुवात 1 सप्टेंबरपासून झाली असून अंतिम चाचणी 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

हे वाचा - VIDEO: नागपूर विमानतळावर लॅन्ड होताच स्वत: ड्राइव्ह करत सचिन वाघोबाच्या दर्शनाला

नासा कॅलिफोर्नियामध्ये eVTOLची चाचणी घेत आहे. हे जवळच्या शहरांमध्ये उडण्यासाठी डिझाइन केलं गेलं आहे. त्याची कामगिरी चाचणी दरम्यान दिसेल. यानंतर येणारा अहवाल भविष्यात एअरटॅक्सीचे मॉडेलिंग आणि सिम्युलेशनचं (Modulation and Simulation) नियोजन करण्यास मदत करेल. भविष्यात एअर टॅक्सी सेवांना मान्यता देण्यासाठी कोणते नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे हे देखील चाचणीस समजू शकणार आहे.

भविष्यात विमानसेवा कशा सुधारता येतील याचा तपास विमान कंपन्या करत आहेत. जर चाचणी यशस्वी झाली तर अशा सेवा पुढील काही वर्षांत देशभरात उपलब्ध होतील. यामुळे विमान उद्योगात मोठा बदल होईल असं नासाच्या अॅडव्हान्स्ड एअर मोबिलिटी कॅम्पेनचे प्रमुख डेव्हिड हॅकेनबर्ग यांनी म्हंटलं आहे.

First published:

Tags: Nasa