Home /News /technology /

Google वर तयार करा आपलं व्हर्च्युअल कार्ड; फेक प्रोफाइल्सना बसेल आळा

Google वर तयार करा आपलं व्हर्च्युअल कार्ड; फेक प्रोफाइल्सना बसेल आळा

सध्या सोशल मीडियाचा (Social Media) वापर करताना सिक्युरिटी (Security) आणि प्राव्हसी (Privacy) ही सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. Google ने त्यावर Virtual Visiting Card चा पर्याय देऊ केला आहे. काय आहे हा नवीन प्रकार?

    नवी दिल्ली,11 डिसेंबर  : गुगलनं (Google) काही दिवसांपूर्वी भारतात ‘पीपल कार्ड्स’ (People Cards) ही सेवा सुरू केली आहे. याआधारे युजर्स आपलं व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड (Virtual Visiting Card) तयार करू शकतात. ज्यामध्ये ते आपली वेबसाईट (Website), सोशल मीडिया (Social Media) हँडल आणि इतर माहिती देऊ शकतात. या फिचरच्या आधारे गुगल सर्च करणंही सोपे होईल. जाणून घेऊ गूगलवर व्हर्च्युअल कार्ड बनविण्याची पध्दत... ‘पीपल कार्ड्स’ बनविण्यासाठी गूगल अकाउंट आवश्यक : ‘पीपल कार्ड्स’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे गुगल ईमेल अकाउंट (Google Account) असणे आवश्यक आहे. कारण याच अकाउंटच्या मदतीनं, तुमचं नाव सर्चमध्ये आल्यानंतर ‘पीपल कार्ड्स’वरील (People Cards) माहिती युजरसमोर सादर होईल. ‘पीपल कार्ड्स’ तयार करण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक देणं आवश्यक आहे. सध्या मोबाईलवरच ही सेवा उपलब्ध : गूगलने सध्या ही सेवा मोबाईलवरच (Mobile) उपलब्ध केली आहे. तसंच सध्या ही केवळ इंग्रजी भाषेतच दिली जाते. लवकरच अन्य भाषांमध्ये आणि अन्य प्लॅटफॉर्म्सदेखील ही सेवा उपलब्ध केली जाईल. कसं तयार कराल तुमचं पीपल कार्ड ?  तुमचं पीपल कार्ड (People Card)तयार करायचे असल्यास सर्वात आधी गूगल अकाउंटमध्ये साईन-इन करा. त्यानंतर 'add me to search'  हे शोधायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 'add yourself to google search' असा ऑप्शन मिळेल. या मेसेजवर टॅप करा.  टॅप केल्यावर गूगल तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक विचारेल. त्यावर येणाऱ्या सहा आकडी कोडनं मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंतर एक फॉर्म येईल. त्यामध्ये आपले पब्लिक प्रोफाईल (Public Profile) तयार करण्यासाठी आवश्यक ती आहिती भरावी लागेल. त्यामध्ये तुमचं शिक्षण, व्यवसाय, काम, यासह आवशयक ती माहिती भरावी लागेल. पीपल कार्डमुळे फेक प्रोफाईलला  बसेल आळा ? या सुविधेच्या माध्यमातून योग्य माहिती लोकांना मिळावी यासाठी गूगल (Google)प्रयत्न करत आहे. अयोग्य युजर्स, भाषा आणि हीन दर्जाचा कॉटेंट ओळखण्यास मदत होईल. पर्यायाने फेक प्रोफाईल्सना आळा बसण्यास मदत होईल. सध्या फेक प्रोफाईल्स तयार करून फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. आर्थिक गुन्हेगारीत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर उपाय योजना शोधल्या जात आहेत. गूगलची ही ‘पीपल कार्ड’ उपाय योजना फेक प्रोफाईल्सला आळा घालण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Google, Social media, Technology

    पुढील बातम्या