• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Jio ची जबरदस्त सर्विस; आता घरबसल्या WhatsApp वरच करता येणार रिचार्ज

Jio ची जबरदस्त सर्विस; आता घरबसल्या WhatsApp वरच करता येणार रिचार्ज

आता कंपनी WhatsApp वरही सर्विस देत आहे. ज्याद्वारे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जिओच्या वेगवेगळ्या सर्विसेजबाबत माहिती मिळवू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio नेहमी नवीन कल्पना घेऊन येत असते. डेटा पॅक, रिचार्ज प्लॅनसह अनेक सुविधा जिओकडून दिल्या जातात. आता कंपनी WhatsApp वरही सर्विस देत आहे. ज्याद्वारे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जिओच्या वेगवेगळ्या सर्विसेजबाबत माहिती मिळवू शकतात. युजर्सला JioFibre आणि JioMart मधून आपल्या नंबरवर रिचार्ज करण्याचीही सुविधा दिली जाते. Jio च्या या व्हॉट्सअ‍ॅप सर्विसद्वारे युजर्स नवं सिम मिळवू शकतात. विविध प्लॅन्स, ऑफर्स, कोरोना वॅक्सिन आणि त्याबाबत माहिती, सिम हरवल्याची माहिती, जिओ मार्ट, इंटरनॅशनल रोमिंग आणि जिओ फायबरचीही माहिती मिळवू शकतात. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषेत माहिती मिळू शकते. व्हॉट्सअ‍ॅप सुविधेद्वारे जिओ नंबरवर रिचार्जही करता येतो.

  अवघ्या 10 मिनिटांत तयार पॅनकार्ड येईल हातात; जाणून घ्या ही सोपी प्रक्रिया

  WhatsApp द्वारे कसा कराल Jio Recharge - - सर्वात आधी फोनमध्ये 7000770007 हा नंबर सेव्ह करावा लागेल. या नंबर Hi लिहून मेसेज करावा लागेल. जर फोनमध्ये नंबर सेव्ह करायचा नसेल, तर https://api.whatsapp.com/send/?phone=%2B917000770007&text=Hi&app_absent=0 या लिंकवर क्लिक करुन मेसेज पाठवता येईल. - त्यानंतर विविध पर्याय दिसतील, ज्यात Recharge a Jio Number किंवा Jio SIM recharge हा पर्याय निवडावा लागेल.

  Aadhaar मध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी नियमांत बदल, UIDAI ने सांगितला नवा नियम

  - या पर्यायवर क्लिक केल्यानंतर जिओ प्रीपेड प्लॅन्स दिसतील. - इथे हवा तो प्लॅन निवडून पेमेंटसाठी अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर कोणत्याही ई-वॉलेटद्वारे रिचार्ज करता येईल.
  Published by:Karishma
  First published: