Home /News /technology /

लाखो रुपये खर्च करुन महागडी गाडी खरेदी करण्याची गरज नाही; स्वस्तात वापरा दर महिन्याला नवी गाडी

लाखो रुपये खर्च करुन महागडी गाडी खरेदी करण्याची गरज नाही; स्वस्तात वापरा दर महिन्याला नवी गाडी

तुम्हाला एखाद्या महिन्यासाठी कारची आवश्यकता असल्यास कार सब्सक्रिशनचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलेही डाउन पेमेंट (Down Payment) व ईएमआय (EMI) भरण्याची आवश्यकता नाही.

    मुंबई, 6 ऑगस्ट : नवनवीन फीचरसह दरवेळी बाजारात दाखल होणाऱ्या कार अनेकांना भुरळ घालतात. एखादी कार खरेदी केल्यानंतर थोडं थांबलो असतो तर आणखी चांगल्या फीचरनी युक्त वाहन मिळालं असतं, असं नेहमी वाटत असतं; पण आता तर देशात ऑटोमोबाइल कंपन्यांनी (Automobile Companies) 1 ते 48 महिन्यांपर्यंतचे कार सब्सक्रिप्शन प्लॅनच (Car Subscription Plan) आणले आहेत. त्यामुळे कार खरेदी न करता कंपनीकडून थेट भाड्याने घेता येऊ शकते. दर महिन्याला तुमची आवडती गाडी घेऊन फिरण्याची हौस या निमित्ताने भागवता येऊ शकते. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. तुम्हाला एखाद्या महिन्यासाठी कारची आवश्यकता असल्यास कार सब्सक्रिशनचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे यासाठी कुठलेही डाउन पेमेंट (Down Payment) व ईएमआय (EMI) भरण्याची आवश्यकता नाही. याऐवजी दर महिन्याला सब्सक्रिप्शन मूल्य द्यावं लागेल. या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही 6 महिन्यांत 6 वेगवेगळ्या कार भाड्याने घेऊन जाऊ शकता. एखाद्या व्यक्तीने सब्सक्रिप्शन प्लॅनची निवड केल्यानंतर त्याच्याकडून भाड्याऐवजी इतर शुल्क मागितलं जाणार नाही. सब्सक्रिप्शन प्लॅन कधीही वाढवता येऊ शकतो. कार भाड्याने घेतलेली कालमर्यादा संपली की कंपनी स्वत: वाहन घेऊन जाईल. त्यानंतर दुसरी कार सब्सक्रिप्शनवर घेता येऊ शकते. नोकरीच्या निमित्ताने एक-दोन वर्षांसाठी स्थलांतरित होतात, अशांसाठी ही योजना उत्तम आहे. असा होऊ शकतो फायदा समजा चार वर्षांसाठी तुम्ही हुंदाई सँट्रो (Hyundai Santro) कार भाड्याने घेतली तर तुम्हाला महिन्याला 15,850 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. दुसरीकडे, जर कारची खरेदी केली तर चार वर्षांसाठी कमीतकमी 14,193 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. शिवाय 27,025 रुपयांचं डाऊनपेमेंट करावं लागेल. विविध कंपन्यांचे असे आहेत सब्सक्रिप्शन प्लॅन विविध कंपन्यांनी कार भाड्याने देण्यासाठी वेगवेगळे सब्सक्रिप्शन प्लॅन आणले आहेत. यात हुंदाई सँट्रो कार एका महिन्यासाठी भाड्याने घेतल्यास 27,399, दोन महिन्यांसाठी 26,799, सहा महिन्यांसाठी 21,999, एका वर्षासाठी 21,099, दोन वर्षांसाठी 20,099, चार वर्षांसाठी 15,850 रुपये द्यावे लागतील. हुंदाई क्रेटा (Hyundai Creta) कारसाठी एका महिन्याचं सब्सक्रिप्शन 43,499, दोन महिने 42,999, सहा महिने 36,599, बारा महिने 35,999, दोन वर्षांसाठी 35,099 रुपये लागतील. डिझेल कार मारूती सुझुकी व्हिटारा ब्रेझा (Vitara Brezzd) भाड्याने घेण्यासाठी एका महिन्यासाठी 33,899 रुपये, दोन महिने 33,299, सहा महिने 28,099, एका वर्षासाठी 27,699, दोन वर्षांसाठी 26,699, दोन वर्षांसाठी 17,875 रुपये भाडे लागेल. महिंद्रा स्कॉर्पिओ (Mahindra Scorpio) या कारसाठी एका महिन्याचं भाडं 41,099, दोन महिने 40,699, सहा महिने 34,799, एक वर्षासाठी 33,899, दोन वर्षांसाठी 32,999 रुपये लागतील. होंडा अमेझ (Honda Amaze) कारसाठी एका महिन्याचं सब्सक्रिप्शन 27,599, दोन महिने 26,999, सहा महिन्यांसाठी 22,499, एका वर्षासाठी 21,599 आणि दोन वर्षांसाठी 20,599 रुपये भाडं निश्चित करण्यात आलं आहे. दरम्यान, राहायला घर आणि कार हे अनेकांचे स्वप्न असतं. पण एकदा का चारचाकी वाहन घेतलं की वर्षानुवर्षे तेच वापरत राहावं लागतं. इच्छा असूनही ते बदलता येतं नाही, अशा परिस्थितीत सब्सक्रिप्शन मूल्य भरून आपली आवडती कार पाहिजे तितके दिवस वापरता येत असल्यानं चांगलीच सोय झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
    First published:

    Tags: Car, Tech news

    पुढील बातम्या