मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता मरिन ड्राइव्ह ते आयफिल टॉवर...कुठेही बसून करा Work from Home, Google Meet चं भन्नाट फीचर

आता मरिन ड्राइव्ह ते आयफिल टॉवर...कुठेही बसून करा Work from Home, Google Meet चं भन्नाट फीचर

Google ने Google Meet वर Animated Video Background फीचर आणलं आहे. Android Users याचा फायदा घेऊ शकतील.

Google ने Google Meet वर Animated Video Background फीचर आणलं आहे. Android Users याचा फायदा घेऊ शकतील.

Google ने Google Meet वर Animated Video Background फीचर आणलं आहे. Android Users याचा फायदा घेऊ शकतील.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : कोरोनामुळे Work from Home चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाला. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून ऑफिसमधील सर्व मीटिंग आणि इतर गोष्टींसाठी Google Meet सारख्या Apps चा वापर वाढला. याच पार्श्वभूमीवर Apps Update ही केले जात आहेत. Google Meet नेही आता एक भन्नाट फीचर रोलआउट केलं आहे. Google ने Google Meet वर Animated Video Background फीचर आणलं आहे. Android Users याचा फायदा घेऊ शकतील.

सध्याच्या काळात ऑफिसेसपासून शाळांपर्यंत व्हिडीओ कॉलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी सतत नवे फीचर्स अपडेट करत आहे. आतापर्यंत Google Meet ची Animated Video Background सुविधा केवळ iOS आणि Desktop साठी होती. आता या फीचरचा वापर Android Users देखील करू शकतात.

Google Meet वर व्हिडीओसह ऑडिओ कसा शेयर करायचा पाहा डेमो...

Privacy -

Animated Video Background या फीचरद्वारे युजर व्हिडीओ कॉलिंगवेळी आपलं बॅकग्राउंड व्हिडीओमध्ये बदलू शकतात. कंपनीने यासाठी 6 व्हिडीओ जारी केले आहेत. ज्यात पार्टी, क्लासरुम सारख्या थीम आहेत. यात आणखी काही बॅकग्राउंड व्हिडीओ मिळतील असंही Google ने म्हटलं आहे. हे नवं फीचर पुढील काही दिवसांत येईल. हे कस्टम बॅकग्राउंड युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी मदत करतील असं कंपनीने म्हटलं आहे.

Google Meet चं भन्नाट फीचर, आता मीटिंगवेळी करता येणार Live Translation

त्याशिवाय, Google Meet ने लाइव्ह ट्रान्सलेटेड कॅप्शनचं (Live Translated Captions) या आणखी एका नव्या फीचरचं टेस्टिंग सुरू केलं आहे, ज्याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल. Google ने दिलेल्या माहितीनुसार, Google Meet Video call आता अधिक ग्लोबल आणि प्रभावी होण्यासाठी हे फीचर मदत करेल. हे फीचर युजर्सला आपल्या भाषेत कंटेंटचा वापर करण्यासाठी, माहिती शेअर करण्यासाठी, शिकण्यासाठी मदत करेल.

First published:

Tags: Google, Tech news