मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Aadhaar Card मोबाईल नंबरसोबत लिंक करुनही OTP येत नसेल तर काय करावं, जाणून घ्या

Aadhaar Card मोबाईल नंबरसोबत लिंक करुनही OTP येत नसेल तर काय करावं, जाणून घ्या

यूआयडीएआय (UIDAI) म्हणते की कमकुवत मोबाईल नेटवर्कमुळेही हा OTP मिळू शकत नाही. जर तुम्ही देखील या समस्येचे बळी असाल, तर तुमच्या क्षेत्रातील मोबाईल नेटवर्क गंभीर समस्या निर्माण करू शकते. यासाठी T-OTP म्हणजेच टाइम बेस्ड ओटीपी वापरा.

पुढे वाचा ...

मुंबई, 28 मार्च : आधार कार्डसोबत (Aadhar Card) मोबाईल नंबर (Mobile Number) आणि ई-मेल अ‍ॅड्रेस लिंक करून घ्या, असं यूआयडीएआयकडून वारंवार सांगितलं जातंय. यूआयडीएआय ही आधार कार्ड जारी करणारी सरकारी एजन्सी आहे. आधार कार्डसोबत मोबाईल नंबर आणि ई-मेल अ‍ॅड्रेस लिंक केल्यास तुम्हाला आधार ऑनलाईन सेवांचा लाभ मिळेल आणि अलर्ट मिळत राहतील. म्हणजेच तुमचा आधार नंबर तुम्हाला माहीत नसताना इतरत्र वापरला जात असेल किंवा त्यावर काही व्यवहार होत असतील तर तुम्हाला लगेच अलर्ट (Alert) मिळतील. मोबाईल नंबर आणि ई-मेल अपडेट न केल्यास हा अलर्ट मिळणार नाही आणि तुमची फसवणूक होऊ शकते. आधारसोबत मोबाईल नंबरची नोंदणी केल्याने तुम्हाला सरकारी सेवांसोबतच निमसरकारी सेवांचा लाभ मिळेल.

आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असतील तर तुम्ही आधार कार्डवरील पत्ता बदलू शकता, आधार डाउनलोड करू शकता आणि इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करू शकता. याशिवाय बँक खातं आणि एनपीएस खातं उघडू शकता. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

Shocking! हा Mobile Number नव्हे तर मृत्यू; ज्याने ज्याने वापरला त्याचा गेला जीव

तुम्हाला जर तुमचं आधार कार्ड व्हेरिफाय (verify Aadhar Card) करायचं असेल तर ते तुमच्या मोबाईलवरून सहज होईल. यासाठी तुम्हाला ई-आधार किंवा आधार लेटर किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील (PVC Card) QR कोड स्कॅन करावा लागेल. परंतु, जर तुम्ही तुमच्या आधारमध्ये दिलेला मोबाईल नंबर बदलला असेल तर तो तुम्ही अपडेट करणं आवश्यक आहे. तुमच्या आधार कार्डवरील मोबाईल नंबर, पत्ता आणि इतर माहिती चूक आहे की बरोबर याची खात्री करायची असेल तर तुम्ही https://myaadhaar.uidai.gov.in/verify-email-mobile लिंकला भेट देऊ शकता.

आधारवरील नंबर बदलल्यानंतर ओटीपी येत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. तर, मोबाईलचे नेटवर्क चांगले नसेल तर, ओटीपी येण्यास अडचणी येतात, असं यूआयडीएआय सांगते. तुम्हाला नेटवर्कची समस्या असेल तर T-OTP म्हणजेच टाईम बेस्ड OTP चा वापर करा. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये mAadhaar अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. mAadhaar वर येणाऱ्या Time based OTP च्या मदतीने तुम्ही आधारशी लिंक केलेल्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकता. आता मोबाईल नंबर आधारशी कसा लिंक करायचा हेदेखील जाणून घेऊ.

सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण

UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (Biometric Authentication) आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. सर्वांत जवळचं केंद्र शोधण्यासाठी तुम्ही https://uidai.gov.in ला भेट देऊ शकता. दरम्यान, जर तुम्ही आधार नोंदणी केंद्रावर जात असाल मूळ कागदपत्रांसोबत फोटोकॉपीदेखील आधार केंद्रावर घेऊन जा. जाण्यापूर्वी, यूआयडीएआय साईटवर तुम्हाला कोणती कागदपत्रं लागतील, याची यादी तपासा.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link