Home /News /technology /

अ‍ॅपल नव्हे तर आता `ही` आहे जगातली Valuable Company; विश्वास बसणार नाही!

अ‍ॅपल नव्हे तर आता `ही` आहे जगातली Valuable Company; विश्वास बसणार नाही!

अमेरिकी तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज अ‍ॅपल आयएनसी. (Apple Inc.) ही जगातली सर्वांत मौल्यवान कंपनी (Most Valuable Company) समजली जाते; पण आता कंपनीच्या डोक्यावरचा मानाचा हा मुकुट दुसऱ्याच कंपनीच्या डोक्यावर चढवण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 12 मे : अमेरिकी तंत्रज्ञान क्षेत्रातली दिग्गज अ‍ॅपल आयएनसी. (Apple Inc.) ही जगातली सर्वांत मौल्यवान कंपनी (Most Valuable Company) समजली जाते; पण आता कंपनीच्या डोक्यावरचा मानाचा हा मुकुट हिसकावला गेला आहे. बुधवारी शेअर्समध्ये (Shares) झालेल्या घसरणीमुळे या कंपनीचे बाजार भांडवल (Market Capital) घटले. त्यामुळे कंपनी आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तथापि, अमेरिकी कंपन्यांमध्ये ती अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. आयफोनची निर्मिती करणाऱ्या या अमेरिकी टेक कंपनीला सौदी अरेबियाची (Saudi Arabia) सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने (Saudi Aramco) मागं टाकलं आहे. ही जगातली सर्वांत मोठी तेल उत्पादक कंपनी (Oil Production Company) आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) कच्चा तेलाच्या किमती वाढल्याचा फायदा सौदी अरामकोला झाला आहे, तर अलीकडच्या काही दिवसांत टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. अ‍ॅपलचे मार्केट कॅप घसरलं बुधवारी, क्लोजिंग दरावर सौदी अरामकोचे बाजार भांडवल अर्थात मार्केट कॅपिटलायझेशन 2.42 लाख कोटी डॉलरवर पोहोचले. तर अ‍ॅपलचे मार्केट कॅपिटलायझेशन 2.37 लाख कोटी डॉलरवर आले. या वर्षाच्या सुरूवातीला अ‍ॅपलचे मार्केट कॅप 3 लाख कोटी डॉलरवर पोहोचले होते. त्यावेळी अरामको अ‍ॅपलपेक्षा 1 लाख कोटी डॉलरने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर आतापर्यंत अ‍ॅपलचे शेअर्स जवळपास 20 टक्क्यांनी घसरले आहे. दुसरीकडे अरामकोच्या शेअरमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अजूनही ही अमेरिकी कंपनी प्रथम क्रमांकावर अमेरिकी कंपन्यांचा विचार केला तर अ‍ॅपल अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. 1.95 लाख कोटी डॉलर मार्केट कॅप असलेली मायक्रोसॉफ्ट (Microsoft) अमेरिकी कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. अ‍ॅपलची पहिल्या तिमाहीतील (जानेवारी ते मार्च 2022) कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. परंतु, चीनमधल्या (China) अनेक शहरांमध्ये कोरोनामुळे (Corona) लॉकडाउन (Lockdown) असल्याने आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम कंपनीच्या एप्रिल ते जून या तिमाहीतल्या कामगिरीवर होऊ शकतो. दुसरीकडे सौदी अरामकोच्या निव्वळ नफ्यात 2021 मध्ये 124 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये या सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) 110 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हाच नफा 2020 मध्ये 49 अब्ज डॉलर इतका होता. रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. याचा फायदा अरामकोला झाला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच टेक कंपन्यांचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून घसरत असल्याचं चित्र आहे.

    First published:

    Tags: Apple, China, Share market

    पुढील बातम्या