नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : HMD ग्लोबल या कंपनीने त्यांच्या Nokia Mobile चे पाच नवीन मोडेल सप्टेंबरमध्ये कोरियाच्या Korea Testing Laboratory मध्ये सर्टिफाय केले आहेत. या पाच नवीन मॉडेलमध्ये TA-1318, TA-1320, TA-1308, TA-1312 आणि TA-1306 यांचा समावेश आहे. यामध्ये हे सर्व फोन 5W चार्जरसह येणार आहेत. हे परवडणाऱ्या किमतीमध्ये येणार असून फीचर्स मात्र कमी असणार असल्याचं बोललं जात आहे. या सर्टिफिकेटवरून हे फोन सर्वात आधी युरोपिअन मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती आहे.
या फोनविषयी आणखी काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये अँड्रॉइड go ही सुविधा देखील मिळणार आहे. या TA-1318, TA-1320, TA-1308, TA-1312 आणि TA-1306 मॉडेल असणाऱ्या फोनमध्ये वायफाय देखील असणार आहे. सर्टिफिकेटनुसार लवकरच हे अँड्रॉइड गो फोन लाँच करण्यात येणार आहेत.
(वाचा - Reliance Jio लवकरच लाँच करणार 8000 हून कमी किंमतीतील 4G स्मार्टफोन)
Nokiamob ने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 8 नवीन फोन नोकिया लाँच करणार आहे. एकाच फोनचे विविध व्हर्जन यामध्ये आहेत. या फोनमध्ये वायफाय असणार असून 2.4 गीगाहर्ट्ज वायफाय फ्रिक्वेन्सी सपोर्ट असणार आहे.
नोकिया परवडणारे फोन बाजारात आणणार असल्याचे समोर येत आहे. सध्या या फोनविषयी अधिक कोणतीही माहिती मिळाली नसून बाजारात हे फोन कधी येणार यासंबंधी देखील कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या प्रकारचे फोन लाँच करून नोकिया आपल्या नवीन एंट्री-लेवल सेगमेंटवर फोकस करणार आहे.
Android Go -
अँड्रॉइड गो हे कमी किमतीच्या मोबाईलसाठी तयार करण्यात आले आहेत. साधारणपणे 2 जीबी आणि त्यापेक्षा कमी रॅम असणाऱ्या फोनमध्ये अँड्रॉइड गो ही सुविधा देण्यात येते. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत किती असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone