Nokia हे जुने आणि पॉप्युलर फोन री-लाँच करणार ; 4G वेरिएंटमध्ये होणार कमबॅक

Nokia हे जुने आणि पॉप्युलर फोन री-लाँच करणार ; 4G वेरिएंटमध्ये होणार कमबॅक

Nokia आपले जुने पॉप्युलर फोन 8000 आणि 6300 पुन्हा एकदा री-लाँच करण्याची योजना आखत आहे. नोकियाच्या या दोन्ही मॉडेलला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : मोबाईल मार्केटमध्ये नोकिया पुन्हा एकदा आपले जुने मॉडेल री-लाँच (Re-launch) करण्याच्या तयारीत आहे. जर्मन साइट Win Futureच्या रिपोर्टनुसार, Nokia आपले जुने पॉप्युलर फोन 8000 आणि 6300 पुन्हा एकदा री-लाँच करण्याची योजना आखत आहे. पण यावेळी हे मॉडेल 4G कनेक्टिविटीसह (4G connectivity) लाँच होणार असल्याचं बोललं जात आहे. नोकियाच्या या दोन्ही मॉडेलला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली होती.

नोकिया आपले हे फोन वर्षाच्या शेवटी लाँच करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोकिया 8000 स्लाइड डिजाइनमध्ये री-लाँच होऊ शकतो. या दोन्ही फोनमध्ये 4G कनेक्शन देण्यात येणार आहे.

(वाचा - Whatsapp Pay in India : अशाप्रकारे बनवा खातं, व्यवहार करणं अधिक सुलभ)

रिपोर्टनुसार, नोकिया हे दोन्ही फोन युरोपमध्ये नोकिया 6.3 आणि नोकिया 7.3 वर्षाच्या शेवटी लाँच करू शकते. नोकिया राइट्स फिनलँड कंपनी HMD ने नोकिया 3310 फोनचं 4G वेरिएंट लाँच केलं आहे. त्याशिवाय नोकिया 880, नोकिया 2720 आणि नोकिया 5310 एक्सप्रेस म्यूजिक हे फोन लाँच केले आहेत.

(वाचा - Jio Recharge Plan: केवळ 1 रुपया अधिक देऊन मिळवा 28 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी)

नोकियाचे 6300 आणि 8000 फोन फीचर कॅटेगरीमध्ये सामिल असणार आहेत. या फोनमध्ये KaiOS मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप असे सोशल मीडिया ऍप्सही सहजपणे वापरता येऊ शकतील.

(वाचा - आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे, कधी आणि कसं सुरू होणार जाणून घ्या)

Published by: Karishma Bhurke
First published: November 6, 2020, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading