Home /News /technology /

ऐकावं ते नवलंच: चंद्रावरही मिळणार 4G नेटवर्क; नोकिया करणार 'नासा'ला मदत

ऐकावं ते नवलंच: चंद्रावरही मिळणार 4G नेटवर्क; नोकिया करणार 'नासा'ला मदत

चंद्रावर 4G नेटवर्कची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी नोकिया (Nokia) नासा (Nasa)ला मदत करणार आहे. भविष्यात चंद्रावर 4G नेटवर्क देण्यासाठी या संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : US मधील NASA ही संस्था Nokia च्या संशोधन विभागाच्या( Bell Labs)साहाय्याने चंद्रावर निघाली आहे. 4G LTE कनेक्टिव्हिटीची सेवा चंद्रावर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजेच इथून पुढे काही वर्षांतर चंद्रावर सुद्धा 4G नेटवर्क मिळणार आहे. लवकरच चंद्रावर अंतराळवीर आणि रोव्हर्स यांच्यात 4G नेटवर्कद्वारे संवाद होणे शक्य होणारआहे. NASA आणि Bell Labs या  संस्थानी याबाबत 15 ऑक्टोबर रोजी स्वतंत्रपणेही घोषणा केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचं बजेट तब्बल $370 million असून त्यातील एक भाग म्हणून NASA फिनिश टेलिकम्युनिकेशन कंपनीला चंद्राच्या पृष्ठभागावर 4G सोल्युशन्सआणण्यासाठी $14.1 million अनुदान देणार आहे. NASA च्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशनची देखरेख करणाऱ्या जिमरी टरयांचं असं म्हणणं आहे की, या प्रकल्पामुळे भविष्यात चंद्रावर असलेल्या अंतराळवीरांचा पृथ्वीवरील माणसाशी संवाद चांगला होईल.आणि भविष्यात चंद्रावर मनुष्यवस्ती झाली तर आणखीच फायद्याचं होईल. या प्रकल्पाबाबत सांगताना Bell Labs ने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, "चंद्राच्या पृष्ठभागावर शाश्वत मानवीवस्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने जो मार्ग तयार होत आहे त्याच्या कामात आणि चंद्रासाठी 'टिपिंग पॉईंट' तंत्रज्ञानाची प्रगती करण्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार म्हणून NASA ने आमचं नाव घेतल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. आमच्या आधुनिक नवकल्पना चंद्रावरील पहिलं वायरलेस नेटवर्क उभारण्यासाठी आम्ही वापरू. सुरुवात 4G नेटवर्कपासून होईल आणि ते विकसित होताना आम्ही 5G कडे सुद्धा वळू." फेब्रुवारी 2018 मध्ये, Vodafone जर्मनीने Nokia सोबत भागीदारीत चंद्रावर 4G नेटवर्क सुरू करण्याची माहिती दिली. 'साखरेच्या पोत्यापेक्षा कमी वजनाचं स्पेस-ग्रेड नेटवर्क विकसित करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांनी करार भागीदारी केलीआहे,' असं Vodafone नी म्हटलं आहे. NASA ने 2024 पर्यंत चंद्रावर पहिल्या महिला आणि पुरुषासह अमेरिकन अंतराळवीर पाठवण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. इतकंच नव्हे तर 2028 पर्यंत NASA ने चंद्रावर "टिकाऊ" वातावरण तयार करण्याची योजना आखली आहे. येणाऱ्या युगात आधुनिक तंत्रज्ञान किती प्रगत होईल याचा आता अंदाज लावणं अगदीच कठीण आहे. माणूस तर चंद्रावर जाणारच, सोबत मोबाईल नेटवर्क सुद्धा असेल!
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Nasa, Technology

    पुढील बातम्या