नवी दिल्ली, 22 डिसेंबर : नोकियाने (Nokia) भारतात होम अप्लायंस (Home appliance) सेगमेंटमध्ये एन्ट्री करत एयर कंडिशनर लाँच केला आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर एसी उपलब्ध करण्यात आला आहे. ग्राहक नोकियाचा एसी 29 डिसेंबरपासून खरेदी करू शकतात. कंपनीचा हा AC भारतातच डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करण्यात आला आहे. नोकियाच्या या एयर कंडिशनर्समध्ये सेल्फ क्लिनिंग टेक्नोलॉजीसह फोर-इन-वन अजस्टेबल इनवर्टर मोड देण्यात आला आहे.
नोकिया एयर कंडिशनर्स विशेषत: भारतीय युजर्सला लक्षात घेऊनच डिझाईन करण्यात आल्याचा दावा फ्लिपकार्टने केला आहे. नोकिया एयर कंडिशनर्समध्ये नेगेटिव आयोनायजरसह सिक्स-इन-वन एयर फिल्टरही देण्यात येणार आहे. त्याशिवाय AC मध्ये अनेक स्मार्ट फीचर्सही देण्यात आले आहेत.
फोनने करता येणार कंट्रोल -
खास बाब म्हणजे नोकियाचे एसी स्मार्टफोनमधूनही कंट्रोल करता येणार आहेत. त्याशिवाय एसी मेंटेन ठेवण्यासाठी वेळोवेळी क्लिनर रिमाइंडर आणि स्मार्ट डायग्नोसिससारखे नोटिफिकेशनही मिळतील. यात देण्यात आलेल्या स्मार्ट टेक्नोलॉजीमुळे क्लायमेट कंडिशन मॉनिटर होऊन खोलीतील हवेने इंप्योरिटीही कमी होऊ शकते.
Get ready to enjoy pure and cool air with Nokia air conditioners from Flipkart. Coming soon in India. https://t.co/AXQSlMgNn6 https://t.co/Z5Gnb3hm6n pic.twitter.com/fUZe075CXr
— Nokia (@nokia) December 21, 2020
हा एयर कंडिशनर डुअल रोटरी कंप्रेसर आणि विना ब्रश DC मोटरयुक्त आहे. तसंच एसीला कस्टमाईज्ड युजर प्रोफाईल आणि मल्टीपल शेड्यूलरसारखे स्मार्ट फीचर देण्यात आले आहेत. तसंच रॅपिड कुलिंग फीचरसह, ऍन्टी-कोरोसिव इंटरनल्सही देण्यात आले आहेत.
Nokia AC 100 टक्के कॉपर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या एसीसह स्टेब्लाजर लावण्याची गरज नसल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यात 145 ते 256V वोल्टेज रेंज देण्यात आली आहे. नोकियाच्या या नव्या AC ची सुरुवातीची किंमत 30,999 रुपये आहे.