मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता नोकियाचा लॅपटॉपही आला; पहिला Nokia PureBook X14 लाँच

आता नोकियाचा लॅपटॉपही आला; पहिला Nokia PureBook X14 लाँच

नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाली आहे. नोकियाच्या या लॅपटॉपचं प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. काय आहेत या लॅपटॉपचे फीचर्स -

  नवी दिल्ली, 14 डिसेंबर : नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाली आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने सोमवारी Nokia PureBook X14 लॅपटॉप लाँचची घोषणा केली आहे. नोकियाच्या या लॅपटॉपचं प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. काय आहेत या लॅपटॉपचे फीचर्स - Nokia PureBook X14 लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 RAM आणि 512GB NVMe SSD सह इंटेल i5 10th Gen क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. विंडोज 10 ओएस असणाऱ्या या लॅपटॉपला 14 इंची फुल एचडी LED बॅकलिट स्क्रीन देण्यात आली आहे. या लॅपटॉपचं वजन 1.1 किलोग्रॅम आहे. साउंडसाठी लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी 1.1 Ghz टर्बो GPU सह इंटीग्रेटेज इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड असेल. लॅपटॉप 8 तास बॅटरी लाईफसह असेल. बॅटरी लवकर चार्ज होण्यासाठी यात 65W फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय, सिंगल HDMI पोर्ट, यूएसबी 3.1, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 2.0 आणि RJ45 पोर्ट आहे. तसंच सिंगल ऑडिओ आउट पोर्ट आणि एक माईक पोर्टही आहे.

  (वाचा- या दिवशी लाँच होणार Realme Watch S Pro आणि ब्ल्यूटूथ इयरफोन; काय आहेत फीचर्स)

  लॅपटॉपला मिळणाऱ्या अ‍ॅडिशनल फीचरमध्ये विंडोज हॅलो फेस अनलॉक, HD IR वेबकॅम, अजेस्टेबल बॅकलाइट किबोर्ड आणि मल्टिपल जेस्चर टचपॅड देण्यात आला आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये इतकी आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या