VIDEO : जगातील पहिला 7 कॅमेरा असलेला फोन लवकरच होणार लाँच, 'ही' असणार किंमत

जगातील पहिला सात कॅमेरे असलेला स्मार्टफोन लवकरच नोकिया कंपनी लाॅच करणार आहे. या फोनची किंमत आणि फिचर काय असतील ते जाणून घ्या.

News18 Lokmat | Updated On: Jan 5, 2019 03:12 PM IST

VIDEO : जगातील पहिला 7 कॅमेरा असलेला फोन लवकरच होणार लाँच, 'ही' असणार किंमत

05 जानेवारी : HMD ग्लोबलने नुकताच 'Nokia 9 PureView' या स्मार्टफोनची किंमत समोर आणली आहे. जगातील पहिला पाच रिअर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन असणार आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनला दोन फ्रंट कॅमेरेदेखील असणार आहेत. अशे एकूण सात कॅमेरे असलेला पहिला स्मार्टफोन असल्यामुळे याची सगळीकडे चर्चा केली जात आहे. स्मार्टफोनमधून आपली फोटोग्राफीची कलाकृती करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

सॅमसंग कंपनीने गेल्या वर्षी पाच कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याची किंमत 37 हजारांपर्यंत होती. 4 रिअर आणि एक फ्रंट कॅमेरा असलेल्या फोनला ग्राहकांनी पसंती न दिल्यानं सॅमसंग कंपनीला या स्मार्टफोनवर सूटही द्यावी लागली होती.

आता नोकिया रिलीज करत असलेल्या फोनची किंमत सॅमसंगच्या या फोनपेक्षा जास्तच आहे. त्याचबरोबर फोनमध्ये फिचर्ससुद्धा अपडेटेड आहेत. Nokia Leaksच्या ट्विटनुसार नोकिया 9 प्युअर व्ह्यू स्मार्टफोनची किंमत 749 आणि 799 युरो म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे 59 हजारांपासून ते 65 हजारांपर्यंत असू शकते. नोकिया कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात महाग स्मार्टफोन Nokia 9 PureView हा फोन असेल.
सात कॅमेरे असलेल्या फोनमधील फोनच्या पाच कॅमेऱ्यांमध्ये पेंटा लेन्स असणार आहे. त्याचबरोबर फ्रंटला 2 कॅमेरे असतील. नोकियाचा हा स्मार्टफोन जगातील पहिला फोन असणार आहे ज्याच्या बॅकसाईडला पाच कॅमेरे असणार आहेत. पण या पाच कॅमेऱ्याच्या लेंस कशाप्रकारे काम करतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  नुकताच Nokia 9 PureView स्मार्टफोनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे या स्मार्टफोनच्या फिचरबाबत माहिती मिळण्यास मदत झाली होती. या स्मार्टफोनचा डिसप्ले 5.9 इंचचा आहे. 8GB रॅम आणि Qualcom snapdragon 845 procesure हा फोन असण्याची शक्यता आहे.हा एण्ड्रॉईड वन डिवाईस असेल ज्याला Android 9 Pie यासोबत रिलीज केलं जाईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...