Home /News /technology /

जबराट! तब्बल एक महिना बॅटरी बॅकअप असणारा Nokiaचा स्मार्टफोन Nokia केला लाँच, किंमत फक्त 4 हजार रूपये

जबराट! तब्बल एक महिना बॅटरी बॅकअप असणारा Nokiaचा स्मार्टफोन Nokia केला लाँच, किंमत फक्त 4 हजार रूपये

जबराट! नोकियाच्या नव्या स्मार्टफोनची बॅटरी चालेल महिनाभर, किंमत एकदम स्वस्त

जबराट! नोकियाच्या नव्या स्मार्टफोनची बॅटरी चालेल महिनाभर, किंमत एकदम स्वस्त

Nokia's New Smartphone: नोकियानं भारतात नवीन फिचर फोन Nokia 8210 4G लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे फोनची किंमत 4,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे

    मुंबई, 3 ऑगस्ट: नोकियानं भारतात नवीन फिचर फोन Nokia 8210 4G लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे फोनची किंमत 4,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे आणि त्यात UniSoC आहे. कंपनीनं या फोनची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे आणि हा फोन सिंगल स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन लाल आणि गडद निळा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. Nokia 8210 4G Amazon India आणि Nokia च्या भारतीय वेबसाइटवरून खरेदी करता येईल. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, तसेच काढता येण्याजोग्या बॅटरी आणि मागील बाजूस एक कॅमेरा देखील आहे. या कँडी बार मोबाईलच्या बॅटरीबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ती सुमारे एक महिन्याच्या स्टँडबाय टाइमसह येते. ही सीरीज 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. नोकियाच्या या फोनमध्ये 2.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. हा फोन Unisoc T107 SoC सह सुसज्ज आहे, आणि ग्राहकांना यामध्ये 48MB RAM आणि 128MB स्टोरेज मिळते, वापरकर्ते या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवू शकता. नोकिया 8210 4G मध्ये 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना ब्लूटूथ V5 मिळतो. तसेच तुम्हाला Snake, Tetris, Blackjack सारखे अनेक गेम प्री-इंस्टॉल केलेले मिळतील. हा फोन ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्टसह येतो. हेही वाचा- Voter ID: मतदार ओळखपत्र बनवणं झालं खूपच सोपं, फक्त ‘या’ लिंकवर जा अन् अर्ज करा तब्बल 27 दिवस चालेल बॅटरी! पॉवरसाठी, या नोकिया फोनमध्ये 1450mAh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 27 दिवसांपर्यंत स्टँडबाय वेळ देते. यामध्ये 4G नेटवर्कवर 6 तासांपर्यंतचा टॉकटाइम दिला जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये वायर्ड आणि वायरलेस मोडसह एफएम रेडिओ आणि एमपी3 प्लेयर देखील मिळतो. तसेच 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन मायक्रो-USB पोर्टसह येतो. अतिरिक्त फिचर म्हणून यात टॉर्च लाईट देखील देण्यात आली आहे. यात पॉवर, न्यूमेरिक आणि फंक्शन की देखील आहेत.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Mobile, Mobile Phone, Smartphone

    पुढील बातम्या