मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Nokia Mobile: 5 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ खास मोबाईल, वायरलेस इयरबड्सही मोफत

Nokia Mobile: 5 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ खास मोबाईल, वायरलेस इयरबड्सही मोफत

Nokia Mobile: 5 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ खास मोबाईल, वायरलेस इयरबड्सही मोफत

Nokia Mobile: 5 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतोय ‘हा’ खास मोबाईल, वायरलेस इयरबड्सही मोफत

Nokia 5710 XpressAudio 4G लॉन्च झाला आहे. खास गोष्ट म्हणजे यात बिल्ट-इन वायरलेस इयरबड आहे, जे स्लीक स्लाइडरसह येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 14 सप्टेंबर: अलीकडच्या काळात विविध मोबाईल कंपन्यांनी अनेक दमदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्या विविध फीचर्स आपल्या स्मार्टफोनमध्ये देत असतात. प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी नोकियानं भारतामध्ये एक दमदार फोन लाँच केला आहे. एचएमडी ग्लोबलच्या नोकियानं (Nokia) भारतात एक नवीन फीचर फोन Nokia 5710 XpressAudio 4G लॉन्च केला आहे. या मोबाईलची खास गोष्ट म्हणजे यात बिल्ट-इन वायरलेस इयरबड आहेत, जी स्लीक स्लाइडरसह येतात. इतकंच नाही तर यात वायरलेस एफएम रेडिओ, एमपी३ प्लेयर, म्युझिक कंट्रोल फीचर देखील आहे. कंपनीनं या फीचर फोनची किंमत फक्त 4,999 रुपये ठेवली आहे आणि त्याचा पहिला सेल 19 सप्टेंबर रोजी आहे. हा फोन नोकिया ऑनलाइन स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. नोकिया ऑनलाइन स्टोअरवरून ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार आहे.

Nokia 5710 XpressAudio 4G मध्ये अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या फोनच्या खास गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास त्यात 2.4-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला संगीत नियंत्रणासाठी बटणं आहेत.

हेही वाचा: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आता सरकारच्या रडारवर! ही चूक केल्यास तब्बल 50 लाखापर्यंतचा दंड

मिळेल मजबूत बॅटरी-

या फोनमध्ये 1450mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी काढली जाऊ शकते. हा फोन स्टँडबायवर आठवडाभर टिकेल असा दावा करण्यात आला आहे. वायरलेस इयरबड्समुळं हे स्पष्ट होतं की या फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. Nokia 5710 XpressAudio 4G लाल, पांढरा, लाल आणि काळा या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

यात डिस्प्लेच्या खाली क्लासिक T9 कीबोर्ड देखील आहे आणि कॅमेरा म्हणून, LED फ्लॅशसह मागील बाजूस 0.3-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

प्लेबॅक सुलभ करण्यासाठी, Nokia 5710 XpressAudio 4G ला एक स्वतंत्र म्युजिक बटण देखील मिळतं. या फोनमध्ये MP3 प्लेयर आणि वायरलेस एफएम रेडिओ देखील आहे.

First published:

Tags: Mobile Phone