आला रे आला नोकिया 5 स्मार्टफोन आला; हे आहेत फिचर्स

आला रे आला नोकिया 5 स्मार्टफोन आला; हे आहेत फिचर्स

गेल्या महिन्यात दिल्ली , मुंबई, बेंगलोर, चेन्नई, चंडीगड, जयपुर, कलकत्ता, लखनऊ, इंदौर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि कालिकत मध्ये त्याचं प्रि-बुकींगही सुरु झालं होतं, आता मात्र हा अॅड्राईड स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झालाय. कंपनीनं सांगितलय की देशातल्या इतर भागातही हा फोन उपलब्ध केला जाईल

  • Share this:

स्नेहल पाटकर,प्रतिनिधी

17 ऑगस्ट: नोकिया 5 स्मार्टफोन भारतातल्या 10 मोठ्या शहरात विक्रीसाठी ऑफलाईन स्टोअर्समध्ये उपलब्ध झालाय. नोकियानं या स्मार्टफोनला भारतात जूनमध्येच लॉन्च केलं होतं. गेल्या महिन्यात दिल्ली , मुंबई, बेंगलोर, चेन्नई, चंडीगड, जयपुर, कलकत्ता, लखनऊ, इंदौर, हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि कालिकत मध्ये त्याचं प्रि-बुकींगही सुरु झालं होतं, आता मात्र हा अॅड्राईड स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झालाय. कंपनीनं सांगितलय की देशातल्या इतर भागातही हा फोन उपलब्ध केला जाईल. नोकिया 6 साठी दहा लाखांहून अधिक रजिस्ट्रेशन केलंय.

नोकिया 5 चे फीचर्स पाहूयात,

- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर

- 2 जीबी रॅम

-16 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे त माइक्रोएसडी कार्डने पर्यंत 128 जीबी एक्स्टेंडेबल.

- कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचं प्रोटेक्शन

- 5.2 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले.

- 13 मेगापिक्सेल चा रिअर कॅमेरा.

- 8 मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा .

- 3000 mAh ची बॅटरी यात आहे.

या हॅन्डसेटसोबत ऑफर देण्यात आलीय. व्होडाफोन युजर्सना 149 रुपयांच्या रिचार्जवर 5 जीबी डेटा मिळेल ही ऑफर तीन महिन्यांपर्यंत ग्राहकांना उपलब्ध असेल. तर 2500 रुपयांचं makemytrip.com चं कूपन ही मिळेल आणि यामध्ये हॉटेल बुकिंगवर 1800 रुपयांची सूट तर विमान तिकिटावर 700 रुपयांची सूट मिळेल.

या अँड्रॉईड स्मार्टफोनची किंमत 12 हजार 499 रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लू, सिल्वर ,ब्लॅक आणि कॉपर या रंगांत उपलब्ध असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading