मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Nokia चा 4G फोन; 3 हजारांत मिळवा 13 दिवस चालणारी बॅटरी

Nokia चा 4G फोन; 3 हजारांत मिळवा 13 दिवस चालणारी बॅटरी

नोकिया 110 4G (Nokia 110 4G) हा नवा फीचर स्मार्टफोन (Feature Smartphone) नोकियाने सादर केला आहे.

नोकिया 110 4G (Nokia 110 4G) हा नवा फीचर स्मार्टफोन (Feature Smartphone) नोकियाने सादर केला आहे.

नोकिया 110 4G (Nokia 110 4G) हा नवा फीचर स्मार्टफोन (Feature Smartphone) नोकियाने सादर केला आहे.

मुंबई 24 जुलै: भारतात मोबाइल सुविधा आली, तेव्हा सुरुवातीच्या काळात हँडसेट बाजारपेठेत ज्या कंपनीचं वर्चस्व होतं, ती कंपनी म्हणजे नोकिया. तेव्हा किंमत, फीचर्स आणि दणकटपणा या सगळ्याच बाबतीत नोकियाचे फोन्स सरस होते. स्मार्टफोन्सचं युग आल्यानंतर मात्र नोकिया कंपनी हळूहळू मागे पडली. तरीही नंतरच्या काळात विंडोज फोनसारखे प्रयोग या कंपनीने केले. गेल्या काही काळात ही कंपनी पुन्हा वेगवेगळ्या प्रयोगांमुळे, नव्या फीचर फोन्समुळे चर्चेत आली आहे.

नोकिया 110 4G (Nokia 110 4G) हा नवा फीचर स्मार्टफोन (Feature Smartphone) नोकियाने सादर केला आहे. HMD ग्लोबलच्या या किफायतशीर फोनमध्ये HD व्हॉइस कॉलिंगसारखं फीचर देण्यात आलं आहे, ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. हा फोन कंपनीने पहिल्यांदा युरोपमध्ये (Europe) सादर केला आहे. हा फोन अवघ्या 2799 रुपयांमध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना Aqua Black आणि Yellow या रंगांच्या मॉडेल्समधून निवड करणं शक्य आहे. आज, 24 जुलै रोजी अॅमेझॉन (Amazon) आणि नोकियाच्या ऑनलाइन स्टोअरवर (Nokia Online Store) या फोनचा सेल (Sale) सुरू होणार आहे. या फोनची स्पेसिफिकेशन्स (Phone Specifications) जाणून घेऊ या.

नवं अपडेट; 14 दिवसांच्या आत पाहावे लागणार WhatsApp वर आलेले Photo-Video, नंतर आपोआपच होणार डिलीट

नोकिया 110 4G या फोनमध्ये 1.8 इंची QVGA कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचं रिझॉल्युशन 120X160 पिक्सेल एवढं आहे. या फीचर फोनमध्ये Unisoc T107 प्रोसेसर आहे. फोनला 128MB रॅम असून, 48MBचं इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून फोनची स्टोरेज क्षमता 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते. Nokia 110 4G फीचर फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी आणि HD व्हॉइस कॉलिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

दमदार बॅटरी - नोकिया 110 4G फोनमध्ये 0.8 मेगापिक्सेलचा QVGA रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Series 30+ ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. नोकिया 110 4G फीचर फोनमध्ये 3-1 स्पीकर्स आणि MP3 प्लेयर देण्यात आला आहे.

Jio Alert! चुकूनही शेअर करू नका तुमचे personal details, अन्यथा....

पॉवरसाठी या फोनमध्ये 1020 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी फोनमधून काढता येते. ही बॅटरी 13 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते. ही बॅटरी एखदा चार्ज केल्यानंतर 16 तास म्युझिक प्लेबॅक (Music Playback) आणि पाच तासांचा 4G टॉकटाइम देते

नोकियाचा हा फोन वायर्ड आणि वायरलेस एफएम रेडिओला (FM Radio) सपोर्ट करतो. फोनमध्ये आयकॉनिक स्नेकसारखे क्लासिक गेम्सही देण्यात आले आहेत. हा फोन 4G कनेक्टिव्हिटीसह आहे. तसंच 3.5 mm चा ऑडिओ जॅकही फोनला देण्यात आला आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Smartphone, Technology