मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Noise Cancellation Microphone: स्मार्टफोनच्या खाली लहान छिद्र का असतं? वैशिष्ट्य समजल्यावर व्हाल थक्क

Noise Cancellation Microphone: स्मार्टफोनच्या खाली लहान छिद्र का असतं? वैशिष्ट्य समजल्यावर व्हाल थक्क

Noise Cancellation Microphone: स्मार्टफोनच्या खाली लहान छिद्र का असतं? वैशिष्ट्य समजल्यावर व्हाल थक्क

Noise Cancellation Microphone: स्मार्टफोनच्या खाली लहान छिद्र का असतं? वैशिष्ट्य समजल्यावर व्हाल थक्क

Noise Cancellation Microphone in Smartphone: प्रत्येक स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला तुम्हाला विविध छिद्र पाहण्यास मिळतात. यामध्येच स्पीकर ग्रिलचा सुद्धा समावेश असतं. जर ते छिद्र तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसतं, तर तुम्ही कॉलवर नीट बोलू शकला नसता.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 सप्टेंबर: अनेकदा कॉल सुरू असताना बॅकग्राउंडमध्ये येत असलेल्या आवाजामुळे समोरची व्यक्ती काय बोलत आहे, हे नीट कळत नाही. अशात जर कॉल ऑफिसचा किंवा इतर काही महत्त्वाच्या कामासंदर्भात असला तर खूपच अडचण होते; पण या समस्येला तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन (Smartphone) कारणीभूत तर नाही ना, याचा कधी विचार केला आहे का? कारण स्मार्टफोनला असं एक छिद्र असतं, ज्यामुळे ही समस्या सुटू शकते.

प्रत्येक स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला तुम्हाला विविध छिद्र पाहण्यास मिळतात. यामध्येच स्पीकर ग्रिलचा (Speaker Grill) सुद्धा समावेश आहे. पण अनेकजण येथील एका छिद्राकडे दुर्लक्ष करतात. खरं तर हे एक लहान छिद्र असून, जे ऑडिओ जॅकच्या पुढे असतं. हे छिद्र पाहिलं, तरी ते नेमकं कशासाठी आहे, हे अनेकांना माहिती नसतं. पण तुम्हाला माहिती आहे का, जर ते छिद्र तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसतं, तर तुम्ही कॉलवर नीट बोलू शकला नसता.

तुम्हाला जर वाटत असेल की, स्मार्टफोनच्या खालील हे लहान छिद्र म्हणजे केवळ डिझाईनचा एक भाग आहे आणि ते असलं काय किंवा नसलं काय, काही फरक पडणार नाही. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण हे छिद्र केवळ डिझाईनचा भाग नसून, ते अतिशय महत्त्वपूर्ण काम करतं. मुळात स्मार्टफोनचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असून, जे कॉलदरम्यान सक्रिय होतं, व तुम्हाला एक उत्कृष्ट कॉलिंग अनुभव देतं. जर हे वैशिष्ट्य नसेल तर कॉल करणं इतकं कठीण होईल, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. हे लहान दिसणारं छिद्र खरं तर नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोनसंबंधी (Noise Cancellation Microphone) आहे. ते प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असतं.

हेही वाचा-Meta Paid Features: फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपच्या खास फीचर्ससाठी मोजावे लागणार पैसे? मेटा कंपनीचा `हा` आहे प्लॅन

नॉईस कॅन्सलेशन मायक्रोफोन-

नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोन हा कॉलिंग दरम्यान सक्रिय होतो. कॉल सुरू असताना हा नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोन आजूबाजूचा आवाज रोखण्याचं काम करतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही गर्दीत असाल, आजूबाजूला खूप गोंगाट होत असेल, अशावेळी कॉलवर बोलत असताना हा मायक्रोफोन फक्त तुमचा आवाज तुमच्यासोबत फोनवर बोलत असणाऱ्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो.

अनेकदा महत्त्वाचा कॉल सुरू असताना आजूबाजूचा आवाज समोरच्या व्यक्तीला ऐकू जात असेल, तर तुमच्या स्मार्टफोनला असणारा नॉइज कॅन्सलेशन मायक्रोफोन खराब तर झाला नाही ना, याची खात्री करणं केव्हाही फायद्याचं ठरेल.

First published:

Tags: Smartphone