चित्रं काढण्याच्या सवयीमुळे 9 वर्षीय मुलाला शाळेत शिक्षक ओरडायचे, आता होतंय कौतुक

शाळेत भिंतीवर चित्रं काढायची सवय होती म्हणून त्याला ओरडा मिळायचा. चित्र काढण्यापासून थांबवलं की त्याची चिडचिड व्हायची.

News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2019 09:00 AM IST

चित्रं काढण्याच्या सवयीमुळे 9 वर्षीय मुलाला शाळेत शिक्षक ओरडायचे, आता होतंय कौतुक

लंडन, 11 नोव्हेंबर : लहान मुलांना चित्र विचित्र सवयी असतात. अर्थात त्यातून त्यांचे कलागुणही दिसतात. आपल्याकडे बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या तारे जमीं पर या चित्रपटात जसं इशानला शाळेबाहेरचं जग आणि रंग यात रमायला आवडायचं तसंच काहीसं ब्रिटनमधील एका मुलाच्या बाबतीत झालं आहे. श्रेयसबरी इथल्या 9 वर्षीय जो व्हेल याला शाळेत बेंच, भिंती यावर चित्रं रेखाटण्याची सवय होती. त्याला अनेकवेळा हे करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. जो ला चित्र काढण्यापासून थांबवलं की तो चिडायचा. शाळेतून शिक्षकांकडून ओरडाही मिळायचा. त्याची ही तक्रार घरापर्यंत पोहचली.

घरी जेव्हा जोच्या आई वडिलांना त्याची चित्र रेखाटण्याची सवय समजली तेव्हा त्याला एका आर्ट स्कूलमध्ये दाखल केलं. तिथं फक्त 6 महिन्यांतच त्याच्या चित्रकलेनं सर्वांना वेड लावलं.

View this post on Instagram

#Doodleprojectday7 #projectcomplete 🙌🏼

A post shared by The Doodle Boy (@thedoodleboy.co.uk) on

आर्ट स्कूलमधील शिक्षकांनी इन्स्टाग्रामवर त्याची डूडल्स शेअर केली. त्यानंतर जो व्हे इतका प्रसिद्ध झाला की त्याला चक्क चित्र काढण्यासाठी ऑफर आल्या. श्रेयसबरी इथल्या एका हॉटेल मालकाने भिंतीवर डूडल काढण्यासाठी त्याला सांगितलं.

Loading...

जो व्हेलचे वडील ग्रेग त्याला शाळा सुटल्यानंतर हॉटेलमध्ये घेऊन जातात. तिथं तो भिंतीवर चित्रे काढत बसतो. त्याच्या वडिलांनी लिंक्ड इनवर त्याचा व्हिडिओ टाकला आहे. त्याच्या या चित्रकलेला 15 लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि कमेंट मिळाल्या आहेत.

ग्रेग यांनी म्हटलं की, त्याला चित्रं काढायला आवडतं. डूडल काढू दिलं नाही की तो शाळेत चिडचिड करायचा. त्यानंतर आम्ही त्याला आर्ट क्लासमध्ये घालण्याचा निर्णय़ घेतला. आता त्याची कला पाहून बरं वाटतं. त्याचं समाधानही होतं आणि वयाच्या 9 व्या वर्षीच त्याचा व्यवसाय सुरू झाला.

VIDEO : सत्तास्थापनेतील संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी भाजपबाबत केलं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: artist
First Published: Nov 11, 2019 08:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...