Home /News /technology /

Data leak संदर्भातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची फेसबुक, व्हॉट्सॲपला नोटीस

Data leak संदर्भातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची फेसबुक, व्हॉट्सॲपला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सॲप आणि फेसबुकला नवीन प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात नोटिस बजावली असून याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

    नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्हॉट्सॲप (Whatsapp) आणि फेसबुकला (Facebook) नवीन प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात नोटिस बजावली असून याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायलायाने व्हॉट्सॲप आणि फेसबुकला सुनावताना म्हटले आहे, की नागरिकांच्या दृष्टीने गोपनीयता अत्यंत महत्वाची आहे. तुमची कंपनी 2-3 ट्रिलीयन डॉलरची असेल, परंतु आपला डेटा कुठेतरी विकला जात असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. लोकांच्या गोपनीयतेचं संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे (New Privacy Policy) लोकांच्या गोपनीयतेचा दुरुपयोग होत असून, डेटा लीक  (Data Leak)केला जात असल्याचे एका जनहित याचिकेत म्हटलं आहे. Google ने दिशाभूल केल्याचा आरोप; 11 लाख युरोचा दंड भरावा लागणार व्हॉट्सॲप आणि फेसबुक युरोपमधील नागरिकांसाठी वेगळा तर भारतीय नागरिकांसाठी वेगळा नियम लावत आहे, ही बाब योग्य नाही, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही कंपन्यांना उत्तर देण्यासाठी समन्स बजावलं आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी असा आरोप केला आहे, की व्हॉट्सॲपने माय वे किंवा हाय वे असा दृष्टीकोन स्वीकारला आहे. हा दृष्टीकोन अनियंत्रित, अन्यायकारक आणि घटनाबाह्य आहे. भारतासारख्या लोकशाहीवादी देशात ही बाब स्विकारार्ह नाही. व्हॉट्सॲप फसव्या पध्दतीने युझर्सचा व्यक्तिगत डेटा जमा करीत आहे. भारतात लाँच होत असताना व्हॉट्सॲपने डेटा आणि मजबूत गोपनीयता तत्वांचे अमिष दाखवत युझर्सला आकर्षित केलं होतं. 2014मध्ये देखील केला होता बदल 2014मध्ये फेसबुकने व्हॉट्सॲप अधिग्रहित केल्यानंतर देखील युझर्सने त्यांच्या डेटा गोपनीयतेबाबत शंका घेण्यास सुरवात केली होती. आपला व्यक्तिगत डेटा (Personal Data) फेसबुकसोबत शेअर केला जाईल, अशी भिती त्यावेळी युझर्सला होती. परंतु, अधिग्रहणानंतर गोपनीयता धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आश्वासन त्यावेळी व्हॉट्सॲपने दिलं होतं. त्यानंतर ऑगस्ट 2016मध्ये व्हॉट्सॲप आपल्या आश्वासनावरुन माघार घेतली आणि त्यांनी नवे गोपनीयता धोरण आणले. त्यामध्ये त्यांनी आपल्या युझर्सच्या अधिकारांशी तडजोड केली आणि त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचे नुकसान केले. व्यावसायिक जाहिराती आणि विपणनासाठी डेटाचा वापर नव्या गोपनीयता धोरणानुसार, फेसबुकने त्याच्या सहकंपन्यांशी व्यावसायिक जाहिराती आणि विपणनासाठी वैयक्तिक डेटा शेअर केला. तेव्हापासूनच कंपनी आपल्या धोरणांमध्ये बदल करीत आहे. जेणेकरुन विस्तृत माहिती जमा करुन आणि त्यावर प्रक्रिया करुन तो डेटा थर्ड पार्टीला पाठवला जाऊ शकेल.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Facebook, Whatsapp

    पुढील बातम्या