Whatsapp चं नवीन अपडेट आता 'ही' मोठी चूक होणार नाही

Whatsapp चं नवीन अपडेट आता 'ही' मोठी चूक होणार नाही

अनेकदा फोटो शेअर करत असताना तो चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. अशासाठीच फोटो चुकीच्या व्यक्तीला पाठवला जाऊ नये यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेलं अपडेट तुम्हाला मदत करेल.

  • Share this:

मुंबई, 21 जून- आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर चॅटिंग करण्यासाठी राहिला नसून आता या अ‍ॅपच्या मार्फत ऑफिसची अनेक कामं काही मिनिटांत पूर्ण केली जातात. फाइल, डॉक्यूमेंट, लोकेशन, व्हिडिओ आणि इमेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. दर काही महिन्यांनी या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल करत असतातकाही महिन्यांपूर्वीच या अ‍ॅपमध्ये काही बदल केले गेले. यात तुम्ही पाठवलेला मेसेज आठ मिनिटांमध्ये डिलीट करता येतो. पण, अनेकदा फोटो शेअर करत असताना तो चुकीच्या व्यक्तीला पाठवला जातो. अशासाठीच फोटो चुकीच्या नंबरला पाठवला जाऊ नये यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचं आलेलं नवं अपडेट तुम्हाला मदत करेल.

व्हॉट्सअ‍ॅप बेटाइन्फोने दिलेल्या माहितीनुसार नवीन अपडेटमध्ये कोणताही फोटो पाठवण्याआधी त्या व्यक्तीचं नाव आणि प्रोफाइल फोटो आधी दिसेल. त्यामुळे फोटो शेअर करताना सऱ्हास होणाऱ्या चुकीपासून तुम्ही वाचू शकाल. आतापर्यंत फोटो पाठवताना डाव्या बाजूला त्या व्यक्तीचा फोटो येत असे. आता त्यासोबत तुमच्या स्क्रीनवर नावदेखील येईल.  व्हॉट्सअ‍ॅप बेटाइन्फोच्यामते या फीचरमुळे व्यक्तीला आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील ग्रुपना याचा  नक्कीच फायदा होईल.

अनेकदा गडबडीत आणि नकळतपणे आपल्याकडून फोटो चुकीच्या व्यक्तीला जातो. तरी काही दिवसांपासून Delete for everyone असा ऑप्शन व्हॉट्सअ‍ॅपने दिला आहे. पण, तो मेसेज डिलीट न केल्यास समोरची व्यक्ती मेसेज, फोटो पाहू शकत होती. आताचे अपडेट हे सध्या 2.19.173 या बेटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. काही दिवसातच बाकीच्या वर्जनसाठीही उपलब्ध केले जाईल.

 Audio साठी आले हे नवीन फीचर

व्हॉट्सअ‍ॅपने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. या फीचरचं नाव  Continuous Audio Message Playback असं असून, यामध्ये चॅट बॉक्समध्ये आलेला वॉइस मेसेज स्वतः हून प्ले होईल. एंड्रॉईड फोनवर 2.19.150 वर्जनमध्ये हे अपडेट उपलब्ध आहे.

असं करा डाऊनलोड

Continuous Audio Message Playback हे फीचर एंड्रॉईड व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन स्टेबल वर्जनमध्ये उपलब्ध आहे. फोनमधील गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅप सर्च करून तुम्ही हे व्हर्जन अपडेट करु शकता.

International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी

First published: June 21, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या