मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsAppचं नवं फीचर, आता व्हिडीओ पाठवताना येणार खास Option

WhatsAppचं नवं फीचर, आता व्हिडीओ पाठवताना येणार खास Option

मीडिया रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या अॅन्ड्रॉईड बीटा वर्जन 2.21.3.13 वर हे फीचर पाहाता येणार आहे. WhatsApp चं हे नवीन आणि खास फीचर लवकरच तुमच्या फोनमध्ये येणार आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 1 मार्च : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत काही ना काही नवं फीचर्स घेऊन येत असतं. अशात आता वापरकर्त्यांसाठी आणखी एक नवं अपडेट आलं आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमध्ये (New Feature) तुम्ही एखादा व्हिडीओ कोणाला पाठवण्याआधी त्याचा आवाज म्यूट (Mute) करता येणार आहे. बऱ्याच काळापासून WhatsApp या नव्या फीचरची टेस्टिंग करत होतं. आता याची प्रतिक्षा यूजर्ससाठी जवळपास संपली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या अॅन्ड्रॉईड बीटा वर्जन 2.21.3.13 वर हे फीचर पाहाता येणार आहे. WhatsApp चं हे नवीन आणि खास फीचर लवकरच तुमच्या फोनमध्ये येणार आहे. सध्या याच स्टेबल वर्जन आलं आहे. अजून हे सगळ्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचलं नसलं, तरी पुढील 1 ते 2 दिवसांपर्यंत ते सगळ्यापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे.

कसं वापरणार नवं फीचर -

एखाद्या व्हॉट्सअॅप यूजरला तुम्हाला असा व्हिडीओ पाठवायचा असेल, ज्यात आवाज नको, तर तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला आधीप्रमाणेच व्हिडीओ पाठवण्याची प्रोसेस फॉलो करायची आहे. WhatsApp चं म्यूट व्हिडीओ फीचर (Mute Video Feature) व्हिडीओ पाठवण्याच्या विंडोमध्येच एडिट व्हिडीओ या ऑप्शनजवळच आहे. वरच्या बाजूला डावीकडे स्पीकरचं आयकॉन आहे. हा व्हिडीओ म्यूट करण्यासाठी यूजरला तो कोणाला पाठवण्याआधी स्पीकर आयकॉनवर क्लीक करायचं आहे. वरती व्हिडीओचं ड्यूरेशन आणि साईजही दिली गेली आहे.

व्हॉट्सअॅप म्यूट फीचरवर कंपनी मागील वर्षापासून काम करत आहे. याचं टेस्टिंग मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आईफोनच्या बीटा वर्जनवर झाली होती. यानंतर आता अॅन्ड्रॉईडवर टेस्टिंग केली गेली आहे. आता लवकरच सगळे यूजर याचा वापर करू शकणार आहेत.

First published:

Tags: Whatsapp, Whatsapp New Feature