मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नव्या वाहनासाठी Bumper to bumper Insurance अनिवार्य, जाणून घ्या डिटेल्स

नव्या वाहनासाठी Bumper to bumper Insurance अनिवार्य, जाणून घ्या डिटेल्स

1 सप्टेंबरपासून ज्यावेळी एखादा व्यक्ती नव्या वाहनाची विक्री करेल, त्यावेळी वाहनाचा बंपर-टू-बंपर इन्शोरन्स (Bumper-to-bumper) अनिवार्य असावा असा निर्णय कोर्टाने दिला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : मद्रास हायकोर्टने (Madras High Court) एका आदेशात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 1 सप्टेंबरपासून ज्यावेळी एखादा व्यक्ती नव्या वाहनाची विक्री करेल, त्यावेळी वाहनाचा बंपर-टू-बंपर इन्शोरन्स (Bumper-to-bumper) अनिवार्य असावा असा निर्णय दिला आहे. हा इन्शोरन्स पाच वर्षांच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर आणि वाहनाचा मालक यांच्या विम्याव्यतिरिक्त असेल.

न्यायमूर्ती एस वैद्यनाथन यांनी अलीकडेच त्यांच्या आदेशात म्हटलं, की या कालावधीनंतर वाहन मालकाने ड्रायव्हर, प्रवासी आणि थर्ड पार्टीसह स्वत:चे हित जपताना काळजी घ्यावी, जेणेकरुन त्यांच्यावर कोणताही अनावश्यक भार येणार नाही. Bumper-to-bumper इन्शोरन्स पाच वर्षाहून अधिक वाढवता येत नाही.

Bumper-to-bumper इन्शोरन्समध्ये वाहनाच्या अशा भागांनाही कव्हर मिळेल, ज्यात सर्वसाधारणपणे विमा कंपन्या कव्हर देत नाहीत.

म्हणून हायकोर्टने दिला असा निर्णय -

विशेष जिल्हा न्यायालयाने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या 7 डिसेंबर 2019 च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी लिमिटेडच्या याचिकेला परवानगी दिली. विमा कंपनीने नमूद केलं आहे, की विमा पॉलिसी वाहनाला केवळ थर्ड पार्टीकडून झालेल्या नुकसानीसाठी होती, वाहनात असलेल्या लोकांसाठी नाही. विमा कंपनीने युक्तीवाद केला, की कार मालकाने अतिरिक्त प्रीमियम भरल्यास कव्हरेज वाढवता येऊ शकतं. यावरच न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

7999 रुपये डाऊन पेमेंट करून घरी आणा ही स्कूटर, काय आहे किंमत आणि फीचर्स

काय आहे बंपर-टू-बंपर इन्शोरन्स -

ज्यावेळी कारचा अपघात होतो, त्यावेळी कारचं मोठं नुकसान होतं. अशा परिस्थितीत बंपर-टू-बंपर इन्शोरन्स अंतर्गत फायदा होऊ शकतो. या इन्शोरन्सचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वाहनाचा भाग कितीही लहान असला, तरी नुकसान झालेल्या वाहनाच्या प्रत्येक भागाचे पैसे दिले जातात. म्हणजेच बंपर-टू-बंपर इन्शोरन्स अंतर्गत 100 टक्के कव्हर मिळतो.

First published: