स्मार्ट व्हा! गाडीची कागदपत्रे जवळ नसतील तरी बिनधास्त रहा, यामुळे होणार नाही दंड

नव्या मोटार व्हेइकल अॅक्टनुसार आता गाडीची कागदपत्रं, लायसन जवळ नसेल तर 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 12:57 PM IST

स्मार्ट व्हा! गाडीची कागदपत्रे जवळ नसतील तरी बिनधास्त रहा, यामुळे होणार नाही दंड

मोटर व्हेइकल अॅक्टनुसार आता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारण्यात येत आहे. वेगानं गाडी चालवणे, रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे, गाडी चालवण्याचा परवाना किंवा इतर कागदपत्रे नसल्यास दंड होऊ शकतो.

अनेकदा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, गाडीची महत्त्वाची कागदपत्रं घरी विसरता. मात्र, आता ही कागदपत्रं विसरलात तरी भीती बाळगू नका. सरकारने यासाठी एक अॅप सुरू केलं आहे. त्यामुळं कागदपत्रं जवळ असायलाच पाहिजे असं काही नाही.

कागदपत्रांऐवजी तुम्ही त्या अॅपमध्ये स्टोअर केलेली कागदपत्रं दाखवू शकता. डीजीलॉकर अॅप डाउनलोड करून तिथं तुम्ही स्टोअर करू शकता. हे अॅप पुर्णपणे सुरक्षित आहे.

DigiLocker App वर अनेक कागदपत्र स्टोअर करता येतात. यात गाडीची महत्त्वाची कागदपत्रे, पॅनकार्ड, पासपोर्ट, गुणपत्रके, प्रमाणपत्रे, याशिवाय इतर आवश्यक कागदपत्रे साठवून ठेवता येतात. तसेच कोणालाही पाठवण्याची सुविधा यामध्ये आहे.

डिजिलॉकरवर 1 जीबीपर्यंत स्टोरेज करता येते. तसेच तुमच्या गुगल, फेसबुकला हे लिंग करता येत असून कागदपत्रे वेगवेगळ्या फाइल टाइपमध्ये सेव्ह करता येतात. यात pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif  या फाइल टाइपचा समावेश आहे.

Loading...

गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरचे अकाउंट सुरू करावे लागेल. तुमच्या मोबाइल नंबरच्या सहाय्यानं रजिस्टर करून व्हेरिफिकेशननंतर तुमचं नाव आणि पासवर्ड टाकता येतो.

डिजिलॉकरवर गाडीच्या कागदपत्रांसह तुमची इतर महत्त्वाची कागदपत्रं साठवता येतील. ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवली आणि तुमच्याकडं कागदपत्रं नसतील मात्र डिजिलॉकरला सेव्ह असतील तर दंड भरावा लागणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...