मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Drink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम

Drink and Drive : दारु पिऊन गाडी चालवणाऱ्याला माणूस नाही तर 'हे' तंत्र रोखणार; पाहा कशी ऑपरेट होते सिस्टीम

ड्रिंक अँड ड्राइव्ह

ड्रिंक अँड ड्राइव्ह

अल्कोहोल शोधण्याची यंत्रणा अनेकप्रकारे कार्य करते. या सिस्टीमच्या मदतीनं ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे सतत लक्ष ठेवता येतं

मुंबई, 22 सप्टेंबर: मद्यपान करून वाहन चालवणं हे जगभरातील रस्ते अपघातांचं प्रमुख कारण आहे. यामुळे दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बहुतेक देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणं बेकायदेशीर आहे. या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते. असं असूनही ड्रंक अँड ड्राईव्ह अर्थात मद्यपान करून वाहन चालवण्याचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. भारतातदेखील स्थिती निराळी नाही. महामार्गांवर मद्यपान करून भरधाव वाहन चालवल्याने दरवर्षी अपघाताच्या अनेक घटना घडतात. अनेक निष्पाप लोकांचा अशा दुर्घटनेत बळी जातो. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारात जर तुमची कार तुम्हाला ड्रायव्हिंग करण्यापासून रोखत असेल तर? मद्यपान करून ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरचा शोध घेण्याच्या तंत्रज्ञानावर अमेरिकेत काम सुरू आहे. या तंत्रज्ञानाला अल्कोहोल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टीम असं नाव देण्यात आलं आहे. ही सिस्टीम थेट कारमध्ये बसवली जाणार आहे. या पद्धतीनं ऑपरेट होते सिस्टीम अल्कोहोल शोधण्याची यंत्रणा अनेकप्रकारे कार्य करते. या सिस्टीमच्या मदतीनं ड्रायव्हरच्या चेहऱ्याकडे सतत लक्ष ठेवता येतं. ड्रायव्हरला अलर्ट ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम काम करते, त्याचप्रमाणे ही सिस्टीम काम करते. जर एखादा ड्रायव्हर दारुच्या नशेत गाडी चालवायला बसला तर लगेच अलार्म वाजू लागतो. मात्र, ही सिस्टीम अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही. यावर अजूनही काम सुरू आहे. हेही वाचा - Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला
अनेकांचा वाचू शकतो जीव अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डानं कार उत्पादकांना हे सेफ्टी फीचर सर्व वाहनांमध्ये मानक म्हणून बसवण्यास सांगितलं आहे. अशा प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक अपघात टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचवता येतील, अशा विश्वास एनटीएसबीला वाटतो. भारतात दरवर्षी होतो हजारो लोकांचा मृत्यू एकट्या अमेरिकेत 2020 या एका वर्षात नशेत गाडी चालवल्यामुळे 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताविषयी बोलायचं झालं तर देशात नशेत गाडी चालवल्यामुळे दरवर्षी सुमारे 8300 लोकांचा मृत्यू होतो. अनेकदा दारूच्या नशेत ड्रायव्हर स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याचं दिसून येतं. यादरम्यान त्याला गाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. वेग, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणं आणि अचानकपणे गाडी मागं घेणं ही रस्ते अपघाताची काही प्रमुख कारणं आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत आहे. अमेरिकेतलं हे तंत्रज्ञान भारतात आल्यास रस्ते अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
First published:

Tags: Tech news

पुढील बातम्या