हुंदईच्या AURA ला टक्कर देणार भारतीय टाटा, 'ही' कार येतेय लवकरच!

हुंदईच्या AURA ला टक्कर देणार भारतीय टाटा, 'ही' कार येतेय लवकरच!

नवीन Tigor ची चाचणी घेत असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : देशात कार उत्पादन क्षेत्रात भारतीय कंपन्या विरुद्ध परदेशी कंपन्यांची शर्यत सुरू आहे. परदेशी कंपन्यांकडून एकापेक्षा एक मॉडेल लाँच केले जात आहे. हुंदईने आपली नवीकोरी AURA लाँच केली आहे. या कारला टक्कर देण्यासाठी टाटाने कंबर कसली आहे.

टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच भारतात आपली नवी कार लाँच करणार आहे. आपल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही नेक्सॉन (Tata Nexon) सोबत प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉज (Tata Altroz) सह आता टाटा कंपनी कॉम्पॅक्ट सिटान कार Tigor चं नवी मॉडेल लाँच करणार आहे.  टाटाची ही कार होंडा अमेज, हुंदईच्या AURA आणि मारूती सुझुकी डिझायरशी सामना करणार आहे.

नवीन Tigor ची चाचणी घेत असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कारदेखो.कॉम ने दिलेल्या वृत्तानुसार, नवी Tigor ही काही Tata Altroz सारखीच दिसत आहे.  यामध्ये वेगळे  फॉग लॅम्प एनक्लोजरसह LED डेटाइम रनिंग लॅम्प्स दिले आहे. परंतु, या कारचा संपूर्ण लूक अजून पाहण्यास मिळाला नाही. या कारच्या इंटरिअर डिझाईनमध्येही बदल करण्यात आले आहे.

इंजिन

नव्या Tigor चे इंजिन हे बीएस-6 मानांकनासह असणार आहे. यात बरेच बदल केले जाणार असल्याची शक्यता आहे. अशीही माहिती मिळतेय की, टाटा या कारमध्ये 1.2-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देईल. हे इंजिन 85hp ची ताकद आणि 114Nm चा टॉर्क जनरेट करेल.

किंमत

सध्या टाटाच्या Tigor ची दिल्ली एक्स-शोरूम किंमतही 5.5 लाखांपासून ते 7.9 लाखांपर्यंत आहे. असं सांगितलं जातंय की, या कारच्या नव्या मॉडेलची किंमतही थोडी जास्त असणार आहे. किंमत वाढवण्याचे खरे कारण म्हणजे, या कारचे इंजिन हे बीएस-6 आणि नवी फिचर्स असणार आहे.

 

अशी आहे हुंदई Aura

हुंदई (Hyundai) ने आपल्या कॉम्पॅक्ट सिडान Aura वरून पडदा हटवला आहे. एक्सेंटचा हा नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे. कंपनीने Aura ला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लाँच केली आहे. सोबतच ही कार बीएस-6 मानांकनासह विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

डिझाइन

ज्या प्रकारे हुंदाईची एक्सेंट, ग्रँड आणि आय10 वर तयार झाली होती, तशीच Aura ही सुद्धा Grand i10 Nios वर तयार झाली आहे. असं यासाठी सांगतोय कारण, या कारचा समोरून लूक पाहिला तर सेम Nios सारखा आहे. यामध्ये सेटिन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर टाइप, हेडलॅम्स आणि फॉग लॅम्पससह R15 Diamond Cut अलॉय व्हिलस दिले आहे. कारच्या रिअरमध्ये स्पोर्टी बंपर दिला आहे. तसंच 3D आउटर लेंससोबत LED टेललॅम्प दिले आहे.

इंजिन

या कारमध्ये कंपनीने BS6 सह पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिले आहे. या कारची चांगली गोष्ट म्हणजे, ही कार कमी व्हायब्रेशन होते आणि चांगल्या परफॉर्मन्ससह जास्त मायलेजही देईल. तसंच हुंदाई AURA देशातील पहिली आपल्या सेग्मेंटमध्ये अशी सिडान कार आहे, ज्यामध्ये BS6 Turbo Charged Petrol Engine दिले आहे.

ऑराचं इंजिन हे 83bhp पॉवर देणारे 1.2-litre BS-VI T-GDI पेट्रोल इंजिन, 100bhp पॉवर देणारे 1.0-litre turbo petrol इंजिन आणि 75hp ताकद देणारे डिझेल इंजिन मिळणार आहे.

इंटेरिअर

हुंदाईने या कारमध्ये 8 इंच इतक्या मोठ्या टचस्क्रीनचा इन्फोटेनमेंट सिस्टम दिला आहे. जो Android Auto आणि Apple CarPlay दोघांनीही सपोर्ट करतो. तसंच यामध्ये Arkamys Premium साऊंड, 5.3 इंचाचा डिजीटल स्पीडोमिटर आणि मल्टी इनफॉर्मेशन डिस्प्लेसह वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या