नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉटसअप बंद होणार?

सरकारच्या नव्या नियमांमुळे भारतातून बाहेर पडावं लागणार की काय याची व्हॉटसअपला चिंता.

News18 Lokmat | Updated On: Feb 7, 2019 08:16 AM IST

नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉटसअप बंद होणार?

सोशल मीडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकार नवी नियमावली लागू करण्याच्या विचारात आहे. प्रस्तावित नियम लागू केल्यास व्हॉटसअप बंद होण्याची शक्यता आहे.

भारतात व्हॉटसअप वापरणाऱ्या युजर्सची संख्या जवळपास 20 कोटी इतकी आहे. जगातील सर्वाधिक युजर्स भारतातील आहेत. सोशल मीडियावरुन अफवा पसरवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने काही नियम तयार केले आहेत.

Loading...

नव्या नियमांमुळे व्हॉटसअपसमोर अडचण निर्माण झाली आहे. याबाबत व्हॉटसअप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी म्हटलं की मेसेज कोणी पाठवला याचा शोध घेण्यासाठी नवीन नियम करण्यात आले असले तरी ते अंमलात आणणं कंपनीसमोर आव्हान आहे.

व्हॉटसअपची मालकी सध्या फेसबुककडे आहे. व्हॉटसअपवरून केले जाणारे चॅट एंड-टू-एंड इनक्रिप्शन असल्याने दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या व्यक्तीला परस्पर वाचता येत नाही. कंपनीलादेखील चॅट पाहता येत नाही.

लोकांना हवी असलेली गोपनियता सरकारच्या नियमामध्ये बसत नाही. प्रस्तावित नियम लागू करायचे असतील तर व्हॉटसअपमध्ये बदल करावे लागतील. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने सेवा पुरवली जाते ती देता येणार नसल्याचं वूग यांनी म्हटलं आहे.

नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉटसअप बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या एंड-टू-एंड इनक्रिप्शनमुळे मेसेज कोणी पाठवला हे कळत नाही. पण याचा दुरूपयोग होत असेल तर योग्य ते बदल करावे लागतील असंही वूग यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2019 08:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...