मायक्रोमॅक्सचा खास सेल्फी स्पेशल बजेट फोन, हे आहेत फीचर्स

मायक्रोमॅक्सचा खास सेल्फी स्पेशल बजेट फोन, हे आहेत फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फ्लॅशसोबत तब्बल 8 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर फ्रंट कॅमेरा आहे तर 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. यासोबतच सुपर पिक्सल, पॅनोरमा हे फीचरदेखील या मोबाईलमध्ये आहेत.

  • Share this:

स्नेहल पाटकर, प्रतिनिधी

8 ऑगस्ट: खास सेल्फी लव्हर्ससाठी डिझाईन केलेला मायक्रोमॅक्सचा 'सेल्फी 2' हा स्मार्ट आणि बजेट फोन नुकताच लाँच झालाय. या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फ्लॅशसोबत तब्बल 8 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर फ्रंट कॅमेरा आहे तर 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. यासोबतच सुपर पिक्सल, पॅनोरमा हे फीचरदेखील या मोबाईलमध्ये आहेत.

मायक्रोमॅक्स सेल्फी 2 चा डिस्प्ले 5.2 इंचाचा आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलंय. या मोबाईलचं इंटरनल स्टोरेज एक्सपांडेबल असून मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 64 जीबीपर्यंत ते एक्सपांड करता येईल.

या मोबाईलमध्ये 1.3 गीगाहटर्जचा क्वॉड कोअर मीडियाटेक प्रोसेसही आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नोगट ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यामध्ये मल्टी टास्किंग विंडोज सारखे नवे फीचरही देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAhची आहे तर याची किंमत 9,999 रुपये आहे.

First published: August 8, 2017, 8:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading