जिओची नवी आॅफर, 399 रूपयात मिळेल 3 महिने अनलिमिटेड डेटा

जिओची नवी आॅफर, 399 रूपयात मिळेल 3 महिने अनलिमिटेड डेटा

हे नवीन प्लॅन 11 जुलैपासून सगळ्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना लागू होणार आहेत.

  • Share this:

12 जुलै: रिलायन्स जिओने आपल्या प्राईम मेंबरसाठी आणखी एक धमाकेदार आॅफर लाँच केलीये. 399 रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला आता 3 महिने अनलिमिडेट डेटा मिळणार आहे. तसंच

309 रुपयांच्या रिचार्जवरही तुम्हाला 2 महिने  डेटा वापरता येणार आहे. याशिवाय पोस्ट पेड प्लॅनच्या व्हेलिडिटीमध्येही वाढ करण्यात आलीये.

हे नवीन प्लॅन 11 जुलैपासून सगळ्या नवीन आणि जुन्या ग्राहकांना लागू होणार आहेत.या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1 जीबी डेटा वापरता येईल. 1 जीबीपेक्षा अधिक डेटा वापरला तर तुम्हाला 128 केबीपीएस इतका स्पीड मिळेल. अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल कॉल या प्लॅनमध्ये फ्री मिळणार आहेत. त्यासोबतच अनलिमिटेड एसएमएसही करता येणार आहेत. ही योजना खास जिओच्या प्राईम मेंबर्ससाठीच आहे. जिओचा प्राईम मेंबरशीप मार्चमध्ये लॉँच झाली होती. लाखो ग्राहकांनी याची मेंबरशीप घेतलेली आहे.

या सगळ्या प्लॅनसची माहिती खाली दिलेल्या टेबलमध्ये आहे.

First published: July 12, 2017, 6:57 PM IST

ताज्या बातम्या