गुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर

गुगल करणार नोकरी शोधण्यात मदत, हे आहे नवीन फिचर

तुम्ही जर "JOB NEAR ME" असं सर्च केलं तर तुमच्या जवळील भागात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे

  • Share this:

24 एप्रिल : नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी गुगल मदतीला धावून आलंय. गुगलने एक नवीन फिचर तयार केलंय. त्यामुळे तुमच्या जवळील भागात उपलब्ध नोकरीची असल्याची माहिती मिळणार आहे.

भारतीय बाजारात आणि डिजीटल वापरकर्त्यांना लक्षात घेता गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये बदल करणार आहे. तुम्ही जर "JOB NEAR ME" असं सर्च केलं तर तुमच्या जवळील भागात उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांची माहिती मिळणार आहे. हे फिचर अँड्राईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफाॅर्म वापरता येणार आहे.

काय आहे हे फिचर ?

गुगलच्या या नव्या अॅपमुळे तरुणांना नोकरी शोधण्यास मदत होणार आहे. सर्च करण्यासाठी या अॅपमध्ये लोकेशन, नोकरीचा प्रकार सारखे फिल्टर देण्यात आले आहे. जेणेकरून नोकरी शोधण्यास सोपं होईल. गुगलने यासाठी लिंकडन, क्विकरजाॅब्स, शाईन डाॅट काॅम सारख्या नोकऱ्यांच्या पोर्टलसोबत भागीदारी केली आहे. सर्चसोबत लिस्टिंग, शेअर आणि अलर्ट सुविधाही देण्यात आली आहे.

First published: April 24, 2018, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading