Home /News /technology /

WhatsApp ची 20 लाख भारतीय खात्यांवर बंदी, तुमचे अकाऊंट वाचवण्यासाठी 'हे' करा

WhatsApp ची 20 लाख भारतीय खात्यांवर बंदी, तुमचे अकाऊंट वाचवण्यासाठी 'हे' करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपनं (WhatsApp) यावर्षी 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीयांच्या अकाऊंट्सवर बंदी घातली आहे.

    मुंबई, 16 जुलै: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपनं  (WhatsApp) यावर्षी 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीयांच्या अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. तसेच त्यांच्याकडे या काळात 345 तक्रारी आल्या आहेत. व्हॉट्सअप कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अनुपालन अहवालात (Compliance Report) ही माहिती देण्यात आली आहे. नव्या आयटी नियमांनुसार (New IT Rules) हा रिपोर्ट प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्हॉट्सअप हा जगातील बलाढ्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. नव्या आयटी नियमानुसार 50 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अहवाल प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. या अहवालात त्यांना मिळालेल्या तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईंचा उल्लेख करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअपने सांगितले की 'कोणत्याही खात्यामधून पाठवण्यात आलेले हानीकारक आणि अनावश्यक मेसेज रोखणे हा आमचा उद्देश आहे. या प्रकारचे मेसेज पाठवाणाऱ्या अकाऊंट्सचा आम्ही तपास लावला आहे. 15 मे ते 15 जून या काळात भारतामधील 20 लाख खात्यांवर या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.' कारवाई टाळण्यासाठी काय करावे? कोणत्याही व्हॉट्सअप युझरनं बेकायदेशीर, अश्लील, द्वेषपूर्ण, धमकावणारे आणि भीतीदायक मेसेज पाठवले अथावा कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केले तर त्याच्या खात्यावर बंदी घालण्यात येते. ही कारवाई टाळण्यासाठी या प्रकारचे कोणतेही मेसेज पाठवू नयेत तसेच कंपनीच्या नियमांचं पालन करावे असं व्हॉट्सअपनं स्पष्ट केलं आहे. Twitter ची मोठी घोषणा! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद हे फीचर करणार बंद, Elon Musk देखील त्रस्त 2019 नंतर ब्लक मेसेजचा अनिधकृत उपयोग करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या खात्यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Social media, Technology, Whatsapp

    पुढील बातम्या