VIDEO - Hyundai Creta : जबरदस्त लुकने केलं घायाळ, शाहरुखने लाँच केली जबरदस्त फीचर्सवाली कार

VIDEO - Hyundai Creta : जबरदस्त लुकने केलं घायाळ, शाहरुखने लाँच केली जबरदस्त फीचर्सवाली कार

स्टायलिश डिझाइनमध्ये असलेल्या नव्या Hyundai Creta नेही सर्वांनाच भुरळ पाडली आहे. किंग खानच्या उपस्थितीत ही गाडी लाँच झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : Auto Expo 2020च्या दुसऱ्या दिवशी Maruti Suzukiच्या  बहुप्रतीक्षित Vitara Brezza Faceliftने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. Vitara Brezza Facelift वरून नजर हटत नाही तोपर्यंत Hyundai Cretaचा new लूक समोर आला आहे. स्टायलिश डिझाईनमध्ये असलेल्या नव्या Hyundai Cretaनेही सर्वांनाच भुरळ पाडली आहे. किंग खान शाहरुखही Hyundai Cretaचा नवा लुक पाहण्यासाठी उपस्थित होता. नवी Hyundai Creta सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक बनवण्यात आली आहे. एका वेगळ्याच लूकमध्ये ही कार समोर आली आहे. ही SUV BS6 कम्प्लायंट इंजिनसोबत दाखल झाली आहे. कारच्या फ्रंटला कॅसकेडिंग ग्रील, स्प्लिट हेडलाईट, एलईडी डीआरएएल, नव्या डिझाईनचे फॉग लॅम्प आणि बंपरच्या बेसवर स्कफ प्लेट देण्यात आली आहे. यामुळे ही नवी कार आणखी आकर्षक दिसत आहे. तसेच, new Creta साईजमध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा आणखी मोठी आहे.

न्यू जनरेशन Creta मध्ये किआ सेल्टॉस इंजिन असणार आहेत. म्हणजे, BS6 कम्प्लायंट 1.5 लीटर पेट्रोल, 1.5 लीटर डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, अशी अपेक्षा आहे. तिन्ही इंजिनसोबत 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड असणार आहेत. 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसोबत सीवीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, 1.5 लीटर डिझल इंजिनसोबत टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 1.4 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत 7 स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

SUV मध्ये आहेत असे फिचर्स

new Hyundai Creta मध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार टॅक्नॉलोजी आणि इस्ट्रूमेंट क्लस्टरसाठी 7 इंचाची एमआईडी सारखे फिचर्स मिळणार आहेत. यासोबतच, वायरलेस चार्जिंगसारखे फीचर्स कारमध्ये असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. new Hyundai Creta मध्ये एअर प्योरिफायर, पावर अजस्टेबल फ्रंट सीट्स, फ्लॅटबॉटम स्टिअरिंग सारखे फिचर्सही दिसतील. तर, टॉप वेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्स असण्याची शक्यता आहे.  new Hyundai Creta मार्च महिन्यात लाँच होणार आहे. त्यामुळे या कारच्या प्रेमात पडलेल्या ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

First published: February 6, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या