मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp ची नवी 5 फीचर्स; तुमच्या फोनमध्ये नेमकं काय बदलणार?

WhatsApp ची नवी 5 फीचर्स; तुमच्या फोनमध्ये नेमकं काय बदलणार?

Whatsapp च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे टेलिग्राम आणि सिग्नलशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप अधिक आक्रमकपणे नवीन गोष्टी सादर करत आहे.

Whatsapp च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे टेलिग्राम आणि सिग्नलशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप अधिक आक्रमकपणे नवीन गोष्टी सादर करत आहे.

Whatsapp च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे टेलिग्राम आणि सिग्नलशी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप अधिक आक्रमकपणे नवीन गोष्टी सादर करत आहे.

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : डेटा लिक, प्रायव्हसी पॉलिसी यामुळे सध्या सतत वादात आणि चर्चेत असलेलं whatsapp काही नवीन फीचर्स घेऊन आलं आहे. यूजर्सना आणखी सोपं आणि सुरक्षित app वाटावं यासाठी त्यांचा प्रयत्न यातून स्पष्ट दिसतो आहे. या पाच नव्या whatsapp features मुळे संपूर्णपणे नाही, पण या अॅप्लिकेशनच्या वापरात आपल्याला बराच फरक दिसू शकेल.

व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे टेलिग्राम व सिग्नल या कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप अधिक आक्रमक झाली असून, लवकरच 5 नवी फीचर्स बाजारात येणार आहे.

फेसबुकसारखं व्हॉट्सॲपमधून लॉगआउट करता येणार?

ज्यांना सतत व्हॉट्सॲपवर मेसेज येत राहतात त्यांच्यासाठी आता फेसबुकसारखं लॉगआउट होण्याचं फीचर उपलब्ध होणार आहे. सध्या व्हॉट्सॲपमध्ये डिलिट करणं हाच पर्याय उपलब्ध आहे. नव्या फीचरमुळे लोक काही काळासाठी व्हॉट्सअपमधून लॉगआउट करू शकतील.

व्हॉट्सॲपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये लॉगआउटचा पर्याय देण्यात आला आहे. हे iso आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे फीचर व्हॉट्सॲप आणि बिझनेस व्हॉट्सॲप दोन्हीमध्ये उपलब्ध असेल. हे फीचर आल्यावर डिलिट हा पर्याय बंद होईल.

अनेक डिव्हाइसमध्ये वापरता येणार एकच व्हॉट्सॲप अकाउंट ?

व्हॉट्सॲप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरवर पण काम करत आहे. ग्राहकांना हे फीचर हवं होतं. त्यामुळे ग्राहक आपलं व्हॉट्सॲप अकाउंट अनेक डिव्हाइसशी लिंक करता येईल. जेणेकरून ते एकच अकाउंट अनेक डिव्हाइसमध्ये एकावेळी वापरू शकतील.

ग्रुप चॅट्समध्ये येऊ शकतो मेन्शन बॅज

अँड्रॉइडच्या व्हॉट्सॲप बीटा अपमध्ये मेन्शन बॅज देण्यात आला आहे जो ग्रुप चॅटमध्ये दिसत राहील. ग्रुपमधल्या चर्चांमध्ये जेव्हा तुमच्याबद्दल चर्चा होईल तेव्हा ग्रुप सेलमध्ये एक नवा बॅज अड होईल. आताही ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल बोललं गेलं तर त्याला नोटिफिकेशन जातंचं पण ही फीचर त्याचं पुढचं पाऊल आहे.

Alert! बनावट FASTag ची होतेय विक्री; फक्त इथूनच खरेदी करा वैध फास्टॅग

व्हॉट्सॲप वेबवरूनही करता येणार कॉल

सध्या फक्त व्हॉट्सॲप कॉल फक्त मोबाईलवरूनच करता येतो. पण अनेक जण webwhatsapp वापरतात. लॅपटॉपवरून whatspp वापरणाऱ्यांना आता कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल वेब व्ह़ॉट्लअपवरून करता येतील. टेलिग्रामममध्ये असं फीचर आहे.

Read later मुळे करता येईल चॅटकडे दुर्लक्ष  

Read Later या फीचरमुळे चॅटकडे दुर्लक्ष करता येणार आहे. ग्राहकांची अनेक दिवसांची ही मागणी व्हॉट्सॲप लवकरच पूर्ण करण्याची शक्यता आहे.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Social media, Tech news, Technology, Whatsapp, WhatsApp features