मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच नवं फीचर, आता फोटो सुद्धा एडिट करून पाठवता येणार!

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच नवं फीचर, आता फोटो सुद्धा एडिट करून पाठवता येणार!

आता व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपवर फोटो एडिटिंग टूल (Photo Editing Tool) उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपवर फोटो एडिटिंग टूल (Photo Editing Tool) उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपवर फोटो एडिटिंग टूल (Photo Editing Tool) उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी ( Whatsapp Users) एक चांगली बातमी आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपवर फोटो एडिटिंग टूल (Photo Editing Tool) उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे फीचर सध्या मोबाइल अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. या नव्या टूलमुळे युझरला फोटो पाठवण्यापूर्वी तो पाहिजे तसा एडिट (Edit) करता येणार असून त्याला स्टिकर्सची (Stickers) जोड देण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. हे टूल लगेचच सर्व युझर्सना दिसेल असं नाही; पण ते लवकरच सर्व युझर्ससाठी उपलब्ध होईल, असं सांगितलं जात आहे. याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या घोषणेप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपच्या 2.21.16.10 या नव्या बीटा व्हर्जनवर (Beta Version) नव्या इमोजी (Emoji) समाविष्ट करण्यात येणार आहेत.

    व्हॉट्सअ‍ॅप अपडेट ट्रॅकर WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपवर नव्या एडिटिंग टूलची नोंद पाहिली आहे. या एडिटिंग ऑप्शनला ड्रॉइंग टूल्स (Drawing Tools) असंही संबोधलं जातं. या टूलच्या साह्याने डेस्कटॉप अ‍ॅप किंवा व्हॉट्सअ‍ॅप वेबवरून फोटो पाठवण्यापूर्वी तो एडिट करता येणार आहे. मोबाइल अ‍ॅपमध्ये यापूर्वीच हे टूल समाविष्ट करण्यात आलं आहे. नव्या ड्रॉइंग टूलमुळे युझरला फोटोला इमोजी किंवा टेक्स्टचीही जोड देता येणार आहे. तसंच फोटो पाठवण्यापूर्वी तो क्रॉप (Crop) किंवा रोटेटही (Rotate) करता येणार आहे.

    नदीच्या बाजूला आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह अन् काळी जादू करणाऱ्या वस्तू!

    व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये एडिटिंगच्या दरम्यान इमेजला स्टीकर्सची जोड देण्यासाठी अजून एक पर्याय मिळण्याची शक्यता असून, असा पर्याय मोबाईल अ‍ॅपवर अद्याप उपलब्ध नाही. जो फोटो तुम्ही पाठवू इच्छिता, तो फोटो निवडल्यानंतर तुम्हाला लगेचच स्क्रीनवर वरच्या बाजूला हे टूल (Tool) दिसू शकणार आहे. फोटोला टेक्स्टची जोड देण्यासाठीचा पर्याय सध्या खालील बाजूला असलेल्या View Once या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

    'बनारसी शालू'चा का आहे एवढा भाव? या कारणामुळे किंमत असते लाखोंच्या घरात

    माध्यमांमधल्या वृत्तानुसार, हे फीचर लवकरच युझर्सच्या वापरासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी कंपनीने युझर्सना अँड्रॉइड, आयओएस (iOS) आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅपचं नवं व्हर्जन अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

    नव्या इमोजीही उपलब्ध होणार

    दुसऱ्या एका वृत्तात WABetaInfo ने असं म्हटलं आहे, की गुगल प्ले बीटा प्रोग्राममध्ये व्हॉट्सअ‍ॅप बीटा अ‍ॅप व्हर्जन 2.21.16.10 अपडेट उपलब्ध करण्यात आलं आहे. यात अनेक नवीन इमोजीचा समावेश आहे. युनिकोड कन्सॉर्शियमने मागील वर्षी जुलैमध्ये या नव्या इमोजी सादर केल्या होत्या आणि त्यांचा समावेश iOS 14.5 मध्ये करण्यात आला होता. आता या इमोजी व्हॉट्सअ‍ॅप बीटा युझर्ससाठी उपलब्ध असतील. यात मल्टिपल-स्किन टोन कपल इमोजी म्हणजेच कपल किसिंग, फेस इन क्लाउड, फेस वुईथ स्पायरल आइज यांचा समावेश आहे. यात एकूण 217 नव्या इमोजी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

    First published:

    Tags: Whatsapp