व्हाॅट्सअॅपने आणलं शानदार फिचर, फक्त 'या'च युजर्सला येईल वापरता

व्हाॅट्सअॅपने आणलं शानदार फिचर, फक्त 'या'च युजर्सला येईल वापरता

व्हाॅट्सअॅप बेटा इन्फोने तयार केलेल्या या नव्या फिचरमुळे लिंकवर क्लिक केल्यावर तिथंच एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्येच तो व्हिडिओ प्ले करता येईल

  • Share this:

17जुलै : व्हॉट्सअॅप सतत अपडेट होतं असतं. आता व्हाॅट्सअॅपने 'युट्यूब प्लेबॅक'चा नवा फिचर घेऊन येतं असल्याची माहिती 'व्हाॅट्सअॅप बेटा इन्फोने' दिली आहे. या फिचरमुळे आता व्हिडिओ लिंकचे व्हिडिओ व्हाॅट्सअॅपवरच पाहता येणार आहेत. पण हा फिचर सगळ्या मोबाईल धारकांना वापरता येणार नाही.

व्हाॅट्सअॅपवर बरेचदा आपले मित्र व्हिडिओ लिंक्स पाठवत असतो. जेव्हा त्या लिंकवर आपण क्लिक करतो तेव्हा त्या लिंकच्या साईटवर किंवा अॅपवर आपण रिडायरेक्ट होतो. त्या लिंकची साईट उघडते आणि मग आपण तो व्हिडिओ पाहू शकतो. पण आता व्हाॅट्सअॅप बेटा इन्फोने तयार केलेल्या या नव्या फिचरमुळे लिंकवर क्लिक केल्यावर तिथंच एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्येच तो व्हिडिओ प्ले करता येईल. व्हिडिओ लिंकच्या साईटवर जायची गरज पडणारच नाही.

गंमत म्हणजे त्या विंडोला आपल्या सोयीनुसार छोटं मोठं करता येईल, व्हिडिओ पाहता पाहता साईझ हवी तशी बदलता येईल. पण एकदा का त्या व्हिडिओ लिंकच्या चॅट बॉक्समधून आपण बाहेर पडलो की लगेच तो व्हिडिओ प्ले होणं बंद होईल.

सध्या तरी या फिचरची टेस्टिंग चालू आहे. पण हा फिचर सगळ्या व्हाट्सअॅप युजर्सला वापरता येणार नाही. 'आयफोन 6' किंवा त्यानंतर रिलीज झालेले आयफोनचे व्हर्जनस ज्यांच्याकडे आहे त्यांनाच हा फिचर वापरता येईल.

First published: July 17, 2017, 6:43 PM IST

ताज्या बातम्या