झोप येत नाही? हा बेल्ट लावा आणि झोपी जा

झोप येत नाही? हा बेल्ट लावा आणि झोपी जा

पॅरिसच्या रिदम या स्टार्टअॅप कंपनीनं यावर अनोखा उपाय शोधून काढलाय. रिदमनं `ड्रिम्स` या नावानं शांतपणे झोप लागण्यासाठी काही डिव्हायसेस शोधून काढलेत.

  • Share this:

अजय कौटिकवार, 16 जुलै : सततची धावपळ. कामाचा ताण. तीव्र स्पर्धा या धावपळीच्या जगात सगळ्यात जास्त हेळसांड होते ती आपल्या झोपेची. त्यात आता भर पडलीय ती मोबाईलच्या वेडाची. या सर्फिंगच्या नादात झोपेचं खोबरं होतं आणि त्याचा परिणाम तब्येतीवर पडतो. सर्व जगभरातच आता निद्रानाशाचा आजार बळावतोय. यावर संशोधनही सरू आहे. पॅरिसच्या  रिदम या स्टार्टअॅप कंपनीनं यावर अनोखा उपाय शोधून काढलाय. रिदमनं `ड्रिम्स` या नावानं शांतपणे झोप लागण्यासाठी काही डिव्हायसेस शोधून काढलेत.

झोपायच्या काही वेळ आधी तुम्ही हा बोल्ट लावून झोपलात तर काही मिनिटांमध्ये तुम्ही गाढ झोपी जाल असा या कंपनीचा दावा आहे. या बेल्टमध्ये अत्याधुनिक सेंन्सर्स असून ते तुमच्या ब्रेनचं मॅपिंग करतात आणि या बेल्टमधून काही साऊंडस् निघतात त्यानं तुम्हाला खूप शांत वाटतं आणि तुम्ही झोपेच्या आधीन होता.

फक्त मोठ्यांसाठीच नाही तर लहान बाळांसाठीही रिदमनं बेबी मॉनिटर्स बेल्टस् तयार केलेत. तो बेल्ट बाळाच्या पायात घातला की बाळ छानपैकी झोपी जातं. त्याचबरोबर हे डिव्हाईस बाळाच्या झोपेची सगळी आकडेवारीही साठवून ठेवतं.

डोक्याला बेल्ट लावायला आवडत नसेल तर झोपताना तुम्ही उशीतही हे स्लीपिंग डिव्हाईस ठेवू शकता. या डिव्हाईसच्या वापरावर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीनं संशोधनही केलंय. शांत झोपेसाठी हे डिव्हाईसेस पूरक ठरतात असा निष्कर्ष या विद्यापीठाच्या रिपोर्टमध्ये काढण्यात आलाय.

त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर आता काळजीचं कारण नाही. हा बेल्ट लावा आणि शांतपणे झोपी जा.

First published: July 16, 2017, 5:29 PM IST

ताज्या बातम्या