Home /News /technology /

Honda City लव्हर्सना लवकरच मिळणार सरप्राइज, मार्चमध्ये लॉंच होणार ‘या’ कार

Honda City लव्हर्सना लवकरच मिळणार सरप्राइज, मार्चमध्ये लॉंच होणार ‘या’ कार

1 एप्रिलपासून देशात BS6 प्रणाली लागू करण्यात आली आहे. याआधी मार्च महिन्यात भारतात वेगवेगळ्या कंपन्या कार लॉंच करत आहेत. कूप, SUV आणि सेडान कारचा समावेश आहे.

    मुंबई,1 मार्च: केंद्र सरकारने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, 1 एप्रिलपासून BS6 प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या आधीच मार्च महिन्यात जवळपास 6 कंपन्या आपापल्या नव्या कार बाजारात उतरवणार आहे. यात कूप, SUV आणि सेडान या सेग्मेंटच्या गाड्यांचा समावेश असणार आहे. Mercedes-Benz GLC Coupe facelift Mercedes-Benz ही जर्मनीची कंपनी 3 मार्चला नवी कार लॉंच करणार आहे. GLC Coupe facelift या गाडीमध्ये LED टेल लाइट्स असणार आहेत. या सोबतच या गाड्यांमध्ये डिफ्यूजर आणि एंगुलर एक्सहॉस्ट टिप्स देखील असणार आहेत. या गाडीचं संपूर्ण इंटीरियर हे खास असणार आहे. नवीन मल्टीफंक्शन स्टियरिंग व्हिल, 10.25 इंचाचा टचस्क्रिन यामध्ये देण्यात येणार आहे. BMW X1 facelift आणखी एक जर्मन निर्मित कार मार्च महिन्यात बाजारात येणार आहे. BMW ची नवी गाडी 5 मार्चला बाजारात येणार आहे. BMW X1 facelift या नावाने ही गाडी बाजारात येणार आहे. ही गाडी म्हणजे BMW चं हे एक अपडेटेड मॉडेल असणार आहे. ज्याचं डिझाईनिंग आणि रिफ्रेश्ड इंटिरियर खास असणार आहे. या गाडीमध्ये नवं ग्रील, रिडिजाइन्ड LED हेडलॅप्स असणार आहे. या गाडीच्या मागे नवा रिफ्रेश्ड LED टेल लाइट असणार आहे. Volkswagen Tiguan AllSpace Volkswagen 6 मार्चला नवी कार लॉंच करणार आहे. Volkswagen कंपनी Tiguan AllSpace या नावाने ही कार लॉच करणार आहे. ही गाडी 7 सीटर असून SUV मॉडल असणार आहे. या गाडीत नवे ग्रिल असून ट्विक्ड LED हेडलाईट असणार आहे. प्रीमियम लेदर सीट्स, थ्री-जोन क्लाइमेच कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखिल या गाडीत असणार आहे. Hyundai Creta Hyundai कंपनी भारतात 17 मार्चला Creta चं नवं व्हर्जन लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी ‘Sensuous Sportiness’ वर आधारित असणार आहे. या गाडीमध्ये स्टाइलिंगवर अधिक भर देण्यात आला आहे. शानदार लूक असणाऱ्या गाडीत 17 इंचची डायमंड कट असलेले एलॉय व्हिल देखील असणार आहे. Honda City नव्या जनरेशनची गाडी म्हणून ओळखली जाणारी Honda City टेस्टिंग दरम्यान पाहायला मिळाली आहे. Honda ची सर्वात अधिक विकल्या जाणाऱ्या गाडींपैकी एक आहे. ही गाडी मार्चमध्ये लॉंच करण्यात येणार आहे. या गाडीच्या इंजिन संदर्भात कंपनीनं अधिक माहिती दिली नाही आहे. मात्र या गाडीमध्ये 1.5 लीटर BS6 इंजिन असणार आहे. या कंपन्यांची आपापसात स्पर्धा आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस कोणती कंपनी पडते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. इतर बातम्या: अत्याधुनिक फीचर्सची मेड इन इंडिया बाइक - Kridn काय आहे किंमत आणि वैशिष्ट्य? Jio ची बेस्ट ऑफर! 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार दुप्पट फायदा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Car, Honda, New car

    पुढील बातम्या