नवी Advance Audi A6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी Advance Audi A6 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Audi कंपनी दिवाळीनिमित्तानं ग्राहकांसाठी एक खास मोठी खरेदीची संधी घेऊन आली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर: Audi कंपनी दिवाळीनिमित्तानं ग्राहकांसाठी एक खास मोठी खरेदीची संधी घेऊन आली आहे. या कंपनीने आता नुकतीच Audi A6 भारतात लाँच केली आहे. हे मॉडेल आतापर्यंतच्या गाड्यांमधील अप-टू-डेट असं मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये Matrix LED headlights देण्यात आले आहेत. ज्यामुळे ह्या गाडीला एका शार्प आणि सुंदर लूक आलाय. ही गाडी पाहता क्षणी तुमच्या नजरेत भरते.

जर्मनीच्या लग्जरीयस कार निर्मिती कंपनीने ऑडीमधील नवीन मॉडेल नुकतच लाँच केलं आहे. ही लग्झरी सिडान कार भारतात सर्वाधिक विकली जाणारी आणि लोकप्रिय अशी कार आहे. Audi कंपनीने A6 मॉडेल 54 लाख 20 हजार किमतीमध्ये भारतात लाँच केलं आहे.

Audi A6 या कारमध्ये आपको 2.0-litre TFSI petrol engine ची सुविधा असणार आहे. 245hp पावर आणि 370 एनएम टॉर्क जनरेट असेल ज्यामुळे ही कार 6.8 सेकंदात साधारण 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतात लाँच होणारी ही ऑडीची पहिली BS VI कम्पलाइंट कार असेल असंही ऑडी कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

लग्झरी आणि टेक्नोलॉजीमध्ये सर्वोत्तम आहे कार

ऑडी A6 च्या यशस्वी लाँचिंग सोहळ्यानंतर ऑडी 8 जनरेशन मॉडेलही घेऊन आलो आहोत. या कारमध्ये उच्च दर्जाची टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. अशी माहिती ऑडीचे अधिकारी बलबीर सिंह ढिल्लो यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: audi
First Published: Oct 25, 2019 08:22 AM IST

ताज्या बातम्या