Home /News /technology /

तुम्हीही Google वर अशा गोष्टी शोधता का? थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी!

तुम्हीही Google वर अशा गोष्टी शोधता का? थेट तुरुंगात होऊ शकते रवानगी!

देशाची आणि जगाची अशी बहुतेक करून कुठलीच माहिती नाही, जी गुगलवर उपलब्ध नाही. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का?

    नवी दिल्ली, 14 मे : Google आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काही माहिती हवी असल्यास लोक पटकन गुगल उघडतात. देशाची आणि जगाची अशी बहुतेक करून कुठलीच माहिती नाही, जी गुगलवर उपलब्ध नाही. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. जाणून घेऊ, कोणत्या गोष्टी Google वर शोधल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. तुम्ही गुगलवर काय सर्च करत आहात, यावर बरंच लक्ष ठेवलं जातं. त्यात सुरक्षा आणि संरक्षण दलाचाही समावेश आहे. अशा स्थितीत तुम्ही एखादी आक्षेपार्ह गोष्ट शोधताना आढळलात तर, पोलिसांची टीम त्याचा मागोवा घेते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या इंटरनेटवर सर्च करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अशा परिस्थितीत या गोष्टींचा शोध घेणं टाळावं. बॉम्ब कसा बनवायचा? बॉम्ब कसा बनवायचा, (How to make a bomb?) हे गुगलवर सर्च केल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. असं केल्यानं तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर याल आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत गुगलवर कधीही बॉम्ब बनवण्याची पद्धत शोधू नका किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणतीही सामग्री शोधू नका. हे वाचा - कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप धावू लागली अन्.., VIDEO चाइल्ड पोर्नोग्राफीही सर्च करणंही महागात पडू शकते लहान मुलांच्या शोषणाशी संबंधित (Child pornography) असा कोणताही मजकूर तुम्ही गुगलवर शोधला, तर असं करणं आपल्याला तुरुंगातही पोहचवू शकतं. भारतीय कायद्यातही यासाठी तरतूद आहे. तुम्हाला पॉक्सो कायद्यानुसार तुरुंगात टाकलं जाऊ शकतं. अशा सामग्रीचा शोध घेतल्यास तुम्हाला पाच ते सात वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. हे वाचा - डान्स करण्यासाठी महिलेला स्टेजवर खेचलं अन्...; लग्नातच तुफान हाणामारी, VIDEO गर्भपाताबद्दल माहिती तुम्ही तुमच्या गुगलवर एखाद्या मुलाचा गर्भपात करण्याचा मार्ग गुगल केला (Information about abortion) तरीही तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडाल. यासंबंधित माहिती तुम्हाला तुरुंगात नेऊ शकते. भारतात गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तो करण्याची परवानगी मिळते. त्यामुळे असं काही शोधण्याच्या मागे न लागणं चांगलं.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Google, Technology

    पुढील बातम्या