... म्हणून ग्राहकांनी फिरवली Netflix कडे पाठ

... म्हणून ग्राहकांनी फिरवली Netflix कडे पाठ

नेटफ्लिक्सने 14 वर्षांपूर्वी व्हिडीओ क्षेत्रात डिव्हीडी (DVD) भाड्याने देण्याची सेवा सुरु केली होती. त्यानंतरची ही सर्वांत मोठी घट ग्राहक संख्येत पाहायला मिळत आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 22 एप्रिल : अमेरिकेत मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेले आहे. परिणामी नागरिकांना आता घराबाहेर पडणं शक्य होत आहे. यामुळे नेटफ्लिक्सने (Netflix) महामारी (Pandemic) काळात घेतलेल्या भरारीवर आता काहीसा परिणाम झाल्याचं दिसून येत असून, नेटफ्लिक्सच्या ग्राहक संख्या (Subscribers Loss) वाढीचा दर कमी होत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत जगातील 4 दशलक्षांपेक्षा अधिक ग्राहक नेटफ्लिक्स या व्हिडीओ स्ट्रिमिंग (Video Streaming) सेवेशी जोडले गेले. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वात कमी वाढ नोंदवली गेली.

द परफॉर्मन्सच्या मंगळवारच्या अहवालानुसार, पहिल्या तिमाहीत 2 दशलक्षांहून कमी ग्राहक जोडले जातील, असा अंदाज व्यवस्थापन आणि विश्लेषकांनी व्यक्त केला होता. गेल्या वर्षी याच कालावधीत नेटफ्लिक्सशी सुमारे 16 दशलक्ष ग्राहक जोडले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाची संख्या मोठी घट दर्शवते. जगभरातील विविध देशांच्या सरकारने लॉकडाऊन (Lockdown) लागू केल्याने जगातील अग्रगण्य व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवेने मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळवले होते.

हा ट्रेंड कायम असल्याचे संकेत नेटफ्लिक्सने दिले असून, चालू एप्रिल ते जून या कालावधीत जगभरात केवळ 1 दशलक्ष ग्राहक वाढीचा अंदाज वर्तवला आहे. मात्र मागील वर्षी याच कालावधीत ग्राहकसंख्या 10 दशलक्षांनी वाढली होती.

नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हेस्टिंग्ज यांनी मंगळवारी प्रसिध्द झालेल्या कंपनीच्या निकालावरील चर्चेदरम्यान सांगितले की आता थोडी गोंधळाची स्थिती आहे. विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत नेटफ्लिक्स अधिक नफा मिळवत आहे. कॅलिफोर्नियातील लॉस गॅटोस (Los Gatos) या कंपनीचा स्टॉक 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदार फारसे उत्सुक दिसत नाहीत. नेटफ्लिक्सने गतवर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. यात नेटफ्लिक्स ने 1.71 अब्ज डॉलर्स म्हणजेच 3.75 डॉलर प्रतिशेअर कमाई केली आहे. मागील वर्षी याच काळात महसूल 24 टक्क्यांनी वाढून 7.16 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. ग्राहकांच्या वाढीतील अपरिहार्य मंदी आणि महामारीमुळे नफ्यातील विसंगती नेटफ्लिक्सच्या व्यवस्थापनाने वारंवार लक्षात आणून दिली आहे.

वाचा: सरकारचा इशारा! तुम्हालाही हा SMS आला असल्यास, लगेच करा डिलीट, बसू शकतो मोठा फटका

आता अमेरिकेतील मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे लोक मुक्तपणे घराबाहेर पडू शकत आहेत. तसेच ते नेटफ्लिक्सवर सिनेमा, मालिका पाहण्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य देत आहेत.

नेटफ्लिक्सचे मुख्य अर्थिक अधिकारी स्पेन्सर न्यूमन यांनी मंगळवारी सांगितले की ही सर्व परिस्थिती कोविड (Covid)मुळे निर्माण झाली आहे.

मागील वर्षभरात जगभरातील ग्राहकांच्या संख्येत 37 दशलक्षांनी वाढ झाली होती. यावर्षी यात किती घट होईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. नेटफ्लिक्सने 14 वर्षांपूर्वी व्हिडीओ क्षेत्रात डिव्हीडी (DVD) भाड्याने देण्याची सेवा सुरु केली होती. त्यानंतरची ही सर्वांत मोठी घट ग्राहक संख्येत पाहायला मिळत आहे.

थर्ड ब्राईडचे विश्लेषक स्कॉट केसलर यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, या वर्षाची सुस्त सुरुवात नेटफ्लिक्स व्यवस्थापनाला त्यांच्या सेवेच्या किंमतीमध्ये बदल करण्यासाठी दबाव आणणारी ठरु शकते किंवा त्यांच्या पहिल्या क्वार्टरमध्ये (First Quarter) विकास वाढवण्यास मदत करु शकते किंवा कंपनी दीर्घ मुदतीवर लक्ष केंद्रित करीत राहील, असं केसलर यांनी स्पष्ट केलं. नेटफ्लिक्स व्यवस्थापनाने एका पत्राव्दारे वर्षाच्या दुसऱ्या सहामहीत महामारीमुळे प्रदर्शित होऊ शकलेल्या किंवा प्रदर्शनास उशीर झालेल्या टीव्ही मालिका आणि चित्रपट प्रदर्शित होतील आणि यामुळे ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल असं आश्वासन गुंतवणूकदारांना देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, नेटफ्लिक्सचे पहिल्या तिमाहीतील महसूलाचे संकेत पाहता हेही वर्ष निराशाजनक जाण्याची शक्यता आहे. अत्यंत कमी ग्राहकांच्या वाढीसह नेटफ्लिक्सची सुरुवात झाली. 2017 ची पहिली तिमाही 21.6 दशलक्ष ग्राहकांच्या वार्षिक वाढीसह संपली.

वाचा: IMEI Number द्वारे शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन; हा आहे सोपा मार्ग

नेटफ्लिक्स व्यवस्थापन वार्षिक ग्राहक वाढीचा अंदाज लावत नसल्याने त्यांची सेवा पहिल्या तिमाहीत किती ग्राहक घेतील हे सांगणे अवघड आहे. घरात असलेल्या लोकांमुळे नेटफ्लिक्सला मोठा फायदा होण्याऐवजी त्यांना डिस्ने (Disney), अ‍ॅपल (Apple) आणि एचबीओ (HBO) सारख्या बडया कंपन्यांच्या व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्व्हिसशी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा करावी लागत आहे.

नेटफ्लिक्स 208 दशलक्ष ग्राहकांसह उर्वरित कंपन्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. यंदा 17 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारी कंपनीने ठेवली असून, संभाव्य हिट शोज किंवा चित्रपटांसह आपल्या लाईनअपमध्ये स्ट्रेन्जर थिंग्ज, क्राऊन आणि ओझार्क या लोकप्रिय मालिकांचाही समावेश केला आहे. हॅस्टिंग्ज आणि न्युमन या दोघांनीही मंगळवारी आपल्या टिप्पणीमध्ये कठोर स्पर्धेचा परिणाम कमी झाल्याचे सांगितले आहे.

जर आम्ही व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं तर आमच्या नफ्याचा मार्ग खूप विस्तीर्ण असल्याचं न्युमन म्हणाले. नेटफ्लिक्स प्रोग्रामिंग (Netflix Programming) विभागाला कर्जातून वित्तपुरवठा केला जातो. पण आता कंपनीला ती बिले उचलण्याची अपेक्षा नाही. इतकंच काय तर काही तरी सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी नेटफ्लिक्स अधिक रोख रक्कम खर्च करणार आहे. गेल्या वर्षी 1.9 अब्ज डॉलर्स रोख रकमेच्या स्वरुपात खर्च केल्यानंतर नेटफ्लिक्सला आशा आहे की यंदा यापेक्षा अधिक खर्च होईल.

First published: April 22, 2021, 8:03 PM IST

ताज्या बातम्या